Video : ‘और बताओ कैसा लगा गाना?’, बादशाह आणि सहदेवचं ‘बचपन का प्यार’ गाणं पाहिलंत?

सोशल मीडियावर सुद्धा हे गाणं आता धुमाकूळ घालत आहे. बादशाहनं खास इन्स्टाग्राम पोस्ट करत चाहत्यांना हे गाण पाहण्याचं आवाहन केलं आहे, (Have you seen the song 'Bachpan Ka Pyaar' by Badshah and Sahadeva?)

Video : 'और बताओ कैसा लगा गाना?', बादशाह आणि सहदेवचं 'बचपन का प्यार' गाणं पाहिलंत?
Follow us
| Updated on: Aug 12, 2021 | 4:10 PM

मुंबई : ‘बचपन का प्यार’ (Bachpan Ka Pyaar) या गाण्याच्या माध्यमातून सोशल मीडियावर (Social Media) लोकप्रिय झालेल्या सहदेव दिर्डोचं पहिलं अधिकृत गाणं रिलीज करण्यात आलं आहे. हे गाणं प्रसिद्ध रॅपर बादशाहनं (Badshah) तयार केलं आहे. गाण्याचे शीर्षकही ‘बचपन का प्यार’ असंच ठेवण्यात आलं आहे. या गाण्याबद्दल बराच काळ सोशल मीडियावर चर्चा होती. शेवटी हे गाणं आता रिलीज करण्यात आलं आहे. महत्त्वाचं म्हणजे स्वत: बादशाहनं हे गाणं आपल्या सोशल मीडियावर सुद्धा शेअर केलं आहे.

‘बचपन का प्यार’ या गाण्यात सहदेवने बादशहासोबत सादरीकरणही केलं आहे. गाणं रिलीज होऊन थोडा वेळ झाला आहे आणि हे गाणं आता यूट्यूबच्या ट्रेंडिंग लिस्टमध्ये आलं आहे. सहदेव, बादशाह व्यतिरिक्त हे गाणं आस्था गिल आणि रिको यांनी एकत्र गायलं आहे. गाण्याचे बोल बादशाहनं लिहिले आहेत. बादशाहनं त्याच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवरही हे गाणं रिलीज केलं आहे.

‘औंर बताओ कैसा लगा गाना?’ बादशाहची खास पोस्ट

सोशल मीडियावर सुद्धा हे गाणं आता धुमाकूळ घालत आहे. बादशाहनं स्पेशल इन्स्टाग्राम पोस्ट करत चाहत्यांना हे गाणं पाहण्याचं आवाहन केलं आहे, एवढंच नाही तर हे गाणं पाहून प्रतिक्रिया देण्यास सुद्धा त्यानं सांगितलं आहे.

पाहा पोस्ट

View this post on Instagram

A post shared by BADSHAH (@badboyshah)

‘बचपन का प्यार’ फेम सहदेव छत्तीसगडच्या सुकमाचा रहिवासी आहे. त्याच्या गाण्यांवर अनेक रील देखील बनवण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर बादशहाबद्दल बोलायचं झालं तर त्यानं इंडस्ट्रीला अनेक हिट गाणी दिली आहेत. त्यापैकी डीजे वाले बाबू, वखरा स्वॅग, चुल, स्टारडे, मूव्ह युअर लक, हॅपी हॅपी ही गाणी खूप प्रसिद्ध झाली. नुकतंच त्याचं आणि जॅकलिनचं पाणी-पानी गाणं रिलीज झालं हे गाणंसुद्धा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं होतं.

संबंधित बातम्या

Devmanus | डोक्यात घाव घातला, बेशुद्धही केलं, जीव घेणार इतक्यात चंदाला जाग आली! आता ‘देवमाणसा’चं काय होणार?

भल्याभल्यांची बोलती बोलती बंद करणारी, ‘ती परत आलीये’ची ‘ती’ नेमकी दिसते तरी कशी? पाहा ‘ती’चा फोटो…

Mayuri Deshmukh : अभिनेत्री मयुरी देशमुखची नवऱ्याच्या वाढदिवशी खास पोस्ट, कविता लिहून व्यक्त केल्या भावना

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.