Hera Pheri 3 | ‘हेरा फेरी 3’मध्ये मुन्ना भाईची एन्ट्री? चाहत्यांमध्ये उत्साह, चित्रपटाबद्दल मोठे अपडेट पुढे

अक्षय कुमार याचा हेरा फेरी 3 हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. सुरूवातीला अक्षय कुमार याने हा चित्रपट करण्यास नकार दिला होता. मात्र, अक्षय कुमार हा या चित्रपटात दिसणार आहे. आता याच चित्रपटाबद्दल मोठे अपडेट पुढे येत आहे.

Hera Pheri 3 | 'हेरा फेरी 3'मध्ये मुन्ना भाईची एन्ट्री? चाहत्यांमध्ये उत्साह, चित्रपटाबद्दल मोठे अपडेट पुढे
Follow us
| Updated on: Mar 02, 2023 | 7:55 PM

मुंबई : हेरा फेरा 3 या चित्रपटामध्ये बाॅलिवूडचा खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमार (Akshay Kumar) हा दिसणार असल्याचे आता स्पष्ट झालंय. यामुळे अभिनेत्याच्या चाहत्यांमध्ये मोठा उत्साह बघायला मिळतोय. अक्षय कुमार याने सुरूवातीला हेरा फेरा 3 या चित्रपटाला नकार दिल्याचे कळाले. इतकेच नाहीतर थेट एका मुलाखतीमध्ये अक्षय कुमार याने म्हटले होते की, मला हेरा फेरा 3 (Hera Pheri 3) या चित्रपटाची स्क्रीप्ट आवडली नसल्याने मी चित्रपटाला नकार दिला आहे. अक्षय कुमार हा हेरा फेरा 3 मध्ये दिसणार नसल्याने त्याचे चाहते नाराज झाले. अक्षय कुमार याच्याऐवजी कार्तिक आर्यन चित्रपटामध्ये धमाका करणार असल्याच्या चर्चाही सुरू झाल्या होत्या.

अक्षय कुमार याला चित्रपटात घेण्यासाठी निर्माते सतत प्रयत्न करत होते. अक्षय कुमार याच्याही चाहत्यांची इच्छा होती की, त्याने हेरा फेरा 3 चित्रपटासाठी होकार द्यावा. शेवटी तेच घडले आणि अक्षय कुमार याने हेरा फेरा 3 साठी होकार दिला. विशेष म्हणजे हेरा फेरा 3 ची शूटिंग सुरू झाली असून याचे काही फोटोही व्हायरल झाले.

आता हेरा फेरा 3 चित्रपटासंदर्भात अत्यंत मोठे अपडेट पुढे येतंय. हेरा फेरा 3 मध्ये अक्षय कुमार याच्यासोबत अजून एक फेमस अभिनेता या चित्रपटामध्ये काम करताना दिसणार आहे. इतकेच नाही तर चित्रपटाच्या स्टोरीबद्दलही महत्वाचे अपडेट कळाले आहे. यावेळी स्टोरीमध्ये मोठा बदल करण्यात आलाय.

रिपोर्टनुसार हेरा फेरी 3 ची स्टोरी ही दुसऱ्या भाग जिथे संपला होता, तिथून सुरू होईल. आंतरराष्ट्रीय स्तरावरील माफियांची स्टोरी या भागामध्ये बघायला मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार नीरजच्या या स्टोरीमध्ये सध्याच्या परिस्थितीनुसार काही ट्विस्ट टाकले गेले आहेत. रिपोर्टनुसार चित्रपटात एका नव्या पात्राचा प्रवेश होणार आहे. या चित्रपटात दुसरा तिसरा कोणी नसून संजय दत्त एका गँगस्टरच्या भूमिकेत दिसणार आहे.

संजय दत्त हा या चित्रपटात रवी किशनच्या लांबच्या भावाच्या भूमिकेत दिसणार आहे. म्हणजेच संजय दत्त या चित्रपटामध्ये धमाका करणार आहे. मात्र, याबद्दल अजून काही माहिती चित्रपट निर्मात्यांनी दिली नाहीये. मात्र, संजय दत्त या चित्रपटामध्ये दिसणार असल्याने त्याच्या चाहत्यांमध्ये उत्साह बघायला मिळतोय.

गेल्या काही दिवसांपासून अक्षय कुमार याचे चित्रपट सतत बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप जाताना दिसत आहेत. अक्षय कुमार याचा नुकताच रिलीज झालेला सेल्फी हा चित्रपट देखील बाॅक्स आॅफिसवर काही धमाका करू शकला नाही. सेल्फी हा देखील चित्रपट फ्लाॅप गेलाय. अनेकांनी अक्षय कुमार याच्यावर टिका केलीये.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.