Hera Pheri 3 | ‘हेरा फेरी 3’मध्ये जोरदार कॉमेडीचा तडका, संजय दत्त साकारणार ही महत्वाची भूमिका
बाॅलिवूड अभिनेता संजय दत्त हा गेल्या काही दिवसांपासून हेरा फेरी 3 या चित्रपटामुळे चर्चेत आहे. आता या चित्रपटात संजय दत्त नेमके कोणते पात्र साकारणार आहे, याबद्दल मोठा खुलासा झाला आहे.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून चाहते हेरा फेरी 3 (Hera Pheri 3) या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत. या चित्रपटाच्या प्रत्येक अपडेटवर चाहत्याच्या नजरा आहेत. अक्षय कुमार हा हेरा फेरी 3 मध्ये नसल्याची चर्चा काही दिवसांपूर्वी रंगली होती. इतकेच नाहीतर स्वत: अक्षय कुमार याने म्हटले होते की, मला चित्रपटाची स्क्रीप्ट अजिबात आवडली नाहीये. यामुळे मी हेरा फेरी 3 चित्रपटाला (Movie) नकार दिला. हेरा फेरी 3 चित्रपटात अक्षय कुमार (Akshay Kumar) ऐवजी कार्तिक आर्यन महत्वाच्या भूमिकेत असल्याचे सांगितले जात होते. मात्र, त्यानंतर चाहते निराश झाले. शेवटी अक्षय कुमार याने हेरा फेरी 3 चित्रपटाला होकार दिला.
हेरा फेरी 3 चित्रपटाचे निर्माते कार्तिक आर्यन याच्यासह अक्षय कुमार याच्याही संपर्कात होते. मात्र, शेवटी या चित्रपटाला अक्षय कुमार याने होकार दिला. फक्त अक्षय कुमार हाच नाहीतर अजून एक बाॅलिवूडचा मोठा अभिनेता हेरा फेरी 3 या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
हेरा फेरी 3 चित्रपटात संजय दत्त महत्वाच्या भूमिकेत असणार असल्याची चर्चा होती. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच संजय दत्त याने सांगितले होते की, मी हेरा फेरी 3 चित्रपटात काम करण्यास उत्सुक आहे. नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये संजय दत्त याने हेरा फेरी 3 चित्रपटातील त्याच्या पात्राबद्दल सांगितले आहे.
यावर्षीच हेरा फेरी 3 चित्रपटाची शूटिंग सुरू करण्यात येणार आहे. हेरा फेरी 3 चित्रपटात संजय दत्त याचे पात्र फिरोज खानच्या वेलकम चित्रपटातील आरडीएक्स या पात्रासारखे असणार आहे. दुबई आणि अबु धाबीमध्ये या चित्रपटाचे शूटिंग हे केले जाणार आहे. हेरा फेरी 3 हा चित्रपट बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट ठरणार आहे.
रिपोर्टनुसार हेरा फेरी 3 ची स्टोरी ही दुसऱ्या भाग जिथे संपला आहे तिथून सुरू होणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील माफियांची स्टोरी या भागामध्ये बघायला मिळणार आहे. नीरजच्या या स्टोरीमध्ये सध्याच्या परिस्थितीनुसार काही ट्विस्ट टाकले गेले आहेत. रिपोर्टनुसार चित्रपटात एका नव्या पात्राचा प्रवेश होणार आहे. आता . हेरा फेरी 3 हा चित्रपट काय धमाका करतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून अक्षय कुमार याचे चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप जाताना दिसत आहे. आता हेरा फेरी 3 या चित्रपटाकडून अक्षय कुमार याच्या चाहत्यांना मोठ्या अपेक्षा नक्कीच आहेत. काही दिवसांपूर्वी अक्षय कुमार याचा सेल्फी हा चित्रपट रिलीज झाला होता. मात्र, सेल्फी देखील फ्लाॅप गेला.