Shehnaaz Gill | या कारणामुळे हनी सिंह याने थेट शहनाज गिल हिला लगावला टोला, म्हणाला की…

शहनाज गिल हिने बिग बाॅसमधून खास ओळख मिळवलीये. विशेष म्हणजे सलमान खान याचा रिलीज झालेला किसी का भाई किसी की जान या चित्रपटामध्ये शहनाज गिल ही महत्वाच्या भूमिकेत होती. शहनाज गिल हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंगही सोशल मीडियावर बघायला मिळते.

Shehnaaz Gill | या कारणामुळे हनी सिंह याने थेट शहनाज गिल हिला लगावला टोला, म्हणाला की...
Follow us
| Updated on: Apr 23, 2023 | 8:23 PM

मुंबई : पंजाबची कतरिना कैफ म्हणून ओळखली जाणारी बाॅलिवूड अभिनेत्री शहनाज गिल (Shehnaaz Gill) ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. बिग बाॅसमधून खरी ओळख ही शहनाज गिल हिला मिळालीये. विशेष म्हणजे बिग बाॅसमधून बाहेर पडल्यानंतर शहनाज गिल हिच्या फॅन फाॅलोइंगमध्ये मोठी वाढ झालीये. नुकताच सलमान खान (Salman Khan) याचा किसी का भाई किसी की जान हा चित्रपट रिलीज झालाय. या चित्रपटातून शहनाज गिल हिने बाॅलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. विशेष म्हणजे शहनाज गिल हिचा अभिनय देखील प्रेक्षकांना आवडलाय. शहनाज गिल हिच्याकडे अजूनही बऱ्याच बाॅलिवूड (Bollywood) चित्रपटांच्या आॅफर आहेत.

शहनाज गिल हिने बिग बाॅसमधून बाहेर पडल्यानंतर स्वत: मध्ये बरेच बदल केले आहे. विशेष म्हणजे शहनाज गिल हिने आपले वजन खूप जास्त कमी केले आहे. बिग बाॅसच्या घरात असताना अनेकदा शहनाज गिल हिला मोटी म्हणून चिडवले जायचे. जबरदस्त असे ट्रांसफॉर्मेशन शहनाज गिल हिने केले आहे.

नुकताच शहनाज गिल हिच्या शोमध्ये गाण्याचे प्रमोशन करण्यासाठी हनी सिंह हा पोहचला होता. यावेळी शहनाज गिल आणि हनी सिंह हे धमाल करताना दिसले. हनी सिंह म्हणाला की, मला माझे वजन कमी करायला आणि अगोदरप्रमाणे सेपमध्ये यायला तब्बल दोन वर्ष लागले आहेत. हनी सिंह हा सात वर्ष पडद्यापासून दूर होता. हनी सिंह याने जोरदार पुनरागमन केले आहे. यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये उत्साह हा बघायला मिळतोय.

यावेळी हनी सिंह हा शहनाज गिल हिला म्हणाला की, तू अगोदरच छान दिसत होती. यावर शहनाज गिल म्हणाली की, जाड? त्यावेळी तू परीसारखी दिसत असल्याचे देखील हनी सिंह म्हणाला. यावेळी इशाऱ्या इशाऱ्यामध्ये हनी सिंह याने शहनाज गिल हिने वजन कमी केल्यामुळे छान दिसत नसल्याचे देखील म्हटले आहे.

हनी सिंह हा त्याच्या आगामी गाण्याचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. हनी सिंह याने काही दिवसांपूर्वी मागील सात वर्ष आपण कशाप्रकारचे जीवन जगत होते, हे सांगितले. डिप्रेशनमध्ये आपल्यासोबत काम घडले होते हे देखील हनी सिंह याने सांगितले. डिप्रेशनमध्ये असताना टीव्ही पाहण्याची आणि मोबाईल वापरण्याची भिती वाटत असल्याचे हनी सिंह याने सांगितले.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.