Honey Singh | काय सांगता हनी सिंह याने चक्क रस्त्यावर फेकल्या नोटा? पाहा व्हिडीओ
बऱ्याच वर्षांपासून हनी परत एकदा त्याच अंदाजामध्ये वापस आलाय.
मुंबई : हनी सिंह याने पत्नीसोबत घटस्फोट घेतल्यामुळे तो चर्चेत आला होता. हनीच्या पत्नीने त्याच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. गेल्या काही वर्षांपासून हनी सिंह हा बाॅलिवूड इंडस्ट्रीपासून दूर होता. यादरम्यान हनी आयुष्यामध्ये मोठा संघर्ष करत असल्याचे समोर आले. आता हनी सिंह याने नोट फेंको: द कर्मपुरा या गाण्याच्या माध्यमातून जोरदार पुनरागमन केले आहे. या गाण्यामध्ये हनी सिंह चक्क कर्मपुरामध्ये रस्त्यावर पैसे उधळताना दिसत आहे. हनी सिंह याचे हे गाणे पाहून त्याच्या चाहत्यांना मोठा आनंद झाला आहे. बऱ्याच वर्षांपासून हनी परत एकदा त्याच अंदाजामध्ये वापस आलाय.
हनी सिंह याचे नोट फेंको हे गाणे चाहत्यांना प्रचंड आवडताना दिसत आहे. या गाण्याला चाहत्यांचा प्रतिसाद मिळतोय. आपल्या दमदार आवाजामध्ये हनी सिंह याने हे गाणे म्हटले आहे.
गेल्या काही वर्षांपासून हनी सिंह याचे चाहते त्याच्या याच पदार्पणाची आतुरतेने वाट पाहात होते. या गाण्यामध्ये हनी सिंह त्याच्या जुन्याच लूकमध्ये दिसतोय. हे गाणे तूफान धमाल करताना दिसत आहे.
हनी सिंह याच्या नोट फेंको: द कर्मपुरा या गाण्याला तीन दिवसांमध्ये 3 मिलियन व्हूज मिळाले आहेत. या गाण्यामध्ये हनी सिंह हा कर्मपुराच्या रस्त्यावर फिरताना दिसत आहे. हा अंदाजा चाहत्यांना आवडलाय.
काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये हनी सिंह म्हणाला होता की, दिवस रात्र मी माझ्या मरणासाठी प्रार्थना करायचो. मला कधीच झोप लागत नव्हती. मी नशेमध्ये पुर्णपणे बुडालो होतो.
यादरम्यान हनी सिंह याला मनोविकाराची लक्षणे होती. हनी म्हणाला की, मला मनोविकार झाला हे कळण्यास तब्बल तीन वर्ष लागली आणि डाॅक्टर सोधण्यास चार वर्ष. आता सर्व व्यवस्थित असल्याचेही हमी म्हणाला.