हनी सिंह याने केली शाहरुख खान याची पोलखोल, लुंगी डांन्स गाण्याबद्दल मोठा गौप्यस्फोट
हनी सिंह हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत आहे. हनी सिंह याचे सध्या जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. हनी सिंह याच्या दणदणीत पुनरागमनामुळे चाहते उत्साही झाले आहेत. हनी सिंह याने नुकताच लुंगी डांन्सवर मोठे भाष्य केले.
मुंबई : रॅपर आणि गायक हनी सिंह हा गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे. हनी सिंह (Honey Singh) याने आपल्या करिअरमध्ये आतापर्यंत अनेक हिट गाणे हे बाॅलिवूडला दिले आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून हनी सिंह हा गायब झाला होता. आता हनी सिंह हा परत त्याच जोशमध्ये परत आलाय. हनी सिंह याचे चाहते त्याच्या याच पुनरागमनाची आतुरतेने वाट पाहात होते. ऐवढे दिवस आपण कुठे आणि कोणत्या परिस्थितीमध्ये (Situation) होतो हे सांगताना हनी सिंह दिसला. हनी सिंह याने धुमधडाक्यात पुनरागमन हे नक्कीच केले आहे. हनी सिंह गेल्या काही दिवसांपासून त्याच्या आगामी गाण्यामुळे चर्चेत आहे.
हनी सिंह त्याच्या आगामी म्यूजिक एल्बम हनी 3.0 मुळे चर्चेत आहे. याचे जोरदार प्रमोशन करताना सध्या हनी सिंह हा दिसत आहे. विशेष म्हणजे याबद्दल चाहत्यांमध्ये मोठे क्रेझ बघायला मिळत आहे. हनी सिंह याने एका मुलाखतीमध्ये त्याच्या लुंगी डांन्स या गाण्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. हनी सिंह याचे बोलणे ऐकून अनेकांना मोठा धक्का बसलाय.
हनी सिंह याने लुंगी डांन्स हे गाणे तयार केले आहे. मात्र, हनी सिंह म्हणाला की, शाहरुख खान याला माझे गाणे लुंगी डांन्स हे अजिबात आवडले नव्हते. शाहरुख खान याला वेगळ्या गाण्याची अपेक्षा होती. हनी सिंह म्हणाला, शाहरुख खान याने मला अंग्रेजी बीट अशाप्रकारचे गाणे तयार करण्यास सांगितले होते आणि त्यानंतर लुंगी डांन्स हे गाणे ऐकले नाही शाहरुख खानला अजिबात आवडले नाही.
हनी सिंह पुढे म्हणाला की, मी शाहरुख खान याला स्पष्ट सांगितले की, जर तुम्हाला हे गाणे घ्यायचे असेल तर घ्या नाही तर मी त्याला सिंगलमध्ये रिलीज करून टाकतो. ज्यावेळी पहिल्यांदा शाहरुख खान मला भेटला त्यावेळी स्पष्ट केले होते की, अंग्रेजी बीटसारखे गाणे हवे आहे. मग मी शाहरुख खानला चित्रपटाची स्टोरी विचारली. त्यावेळी तीन तास मला ती स्टोरी सांगण्यात आली.
चित्रपटाची स्टोरी ऐकल्यावर मी थेट लुंगी डांन्स हे गाणे तयार केले. मी त्याचवेळी त्यांना सांगितले होते की, मी माझ्या मनावर गाणे बनवेल आणि ते हिट देखील ठरेल. मात्र, लुंगी डांन्स गाणे त्यांना समजले नाही आणि मी त्यांना स्पष्ट सांगितले की, ठिक आहे मीच गाणे रिलीज करतो. मग त्यानंतर त्यांनी त्यांच्या चित्रपटात हे गाणे घेतले आणि हे गाणे सुपर हिट ठरले.
मुळात म्हणजे चेन्नई एक्सप्रेस हा रोहित शेट्टी याचा चित्रपट हिट ठरला. या चित्रपटात शाहरुख खान आणि दीपिका पादुकोन यांची जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली. लुंगी डांन्स हे गाणेही चित्रपटातील हिट ठरले. आजही लोक मोठ्या प्रमाणात या गाण्याला प्रेम देताना दिसतात. अनेक कार्यक्रमांमध्ये या गाण्यावर जबरदस्त असा डान्स केला जातो.