Fighter | अखेर चाहत्यांची प्रतीक्षा संपली, हृतिकने ‘या’ चित्रपटाची केली घोषणा!
हृतिक रोशनने (Hrithik Roshan) आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने चाहत्यांना मोठी भेट दिली आहे.
मुंबई : हृतिक रोशनने (Hrithik Roshan) आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने चाहत्यांना मोठी भेट दिली आहे. हृतिकने त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली असून या चित्रपटामध्ये दीपिका पादुकोण (Deepika Padukone) देखील काम करणार आहे. या चित्रपटाचे नाव फाइटर (Fighter) आहे. चित्रपटाबद्दल सांगताना हृतिकने लिहिले की, दीपिकाचा आणि माझा पहिलाच फाइटर हा चित्रपट आहे त्यासाठी मी उत्सुकही आहे. (Hrithik Roshan and Deepika Padukone’s new movie)
जेव्हा हृतिकने काही दिवसांपूर्वी दीपिकाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या त्यावेळी दीपिका म्हणाली होती की, येणाऱ्या दिवसांत डबल सेलिब्रेशन होणार आहे. दीपिकाच्या या ट्विटनंतर हे दोघेही लवकरच चित्रपटाची घोषणा करू शकतात असा अंदाज चाहत्यांकडून व्यक्त केला जात होता. वृत्तानुसार, हृतिक आणि दीपिका दोघेही या चित्रपटात स्टंट करताना दिसणार आहेत.
View this post on Instagram
दीपिका धूम 4 (Dhoom 4) मध्ये लवकरच दिसू शकते. मीडिया रिपोर्टनुसार दीपिका पादुकोण या चित्रपटात स्टाईलिश चोरणीची भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाविषयी दीपिकाबरोबर चर्चा सुरू आहे. दीपिका सध्या शाहरुख खानसोबत पठाण चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. रिपोर्टनुसार जॉन अब्राहम पठाण या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. यापूर्वी शाहरुख आणि दीपिकाची जोडी ‘ओम शांती ओम’ चेन्नई एक्सप्रेस आणि हॅपी न्यू इयरमध्ये दिसली होती, ही जोडी चाहत्यांनी खूप आवडली होते.
दीपिका पादुकोण सध्या शकुन बत्राच्या सिद्धांत चतुर्वेदी आणि अनन्या पांडे यांच्या पुढच्या चित्रपटाची शूटिंग करत आहे. अलीकडेच दीपिकाने एक फोटो शेअर केला आहे. ज्यात तिने ओन्ली लव्ह लिहिले होते, दीपिकाच्या आगामी चित्रपटाचे शीर्षक असण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.