‘हृतिक रोशन के घर सीलन?’, घरातील ओल पकडलेल्या भिंतीला पाहून चाहतीचा प्रश्न, उत्तर देताना हृतिक म्हणतो…

आपल्या प्रत्येक चित्रपटातून करोडोंची कमाई करणाऱ्या हृतिक रोशनने नुकताच एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्यामध्ये अभिनेत्याची आई (पिंकी रोशन) दिसत आहे. पण या फोटोमध्ये त्याच्या घराच्या भिंतीवर काहीसा ओलसरपणा दिसत आहे. यामुळे भिंतीचे नुकसान देखील झाले आहे.

‘हृतिक रोशन के घर सीलन?’, घरातील ओल पकडलेल्या भिंतीला पाहून चाहतीचा प्रश्न, उत्तर देताना हृतिक म्हणतो...
Hrithik Roshan
Follow us
| Updated on: Sep 15, 2021 | 2:50 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) त्याचा डान्स, स्टाईल आणि अभिनयाच्या जोरावर त्याच्या चाहत्यांच्या हृदयावर राज्य करतो. त्याच्या पहिल्याच चित्रपटापासून चाहत्यांची मने जिंकणाऱ्या हृतिकचे चाहते अभिनेत्याशी संबंधित प्रत्येक बातमी जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. अलीकडेच हृतिकने असा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे की, त्यानंतर तो खूप चर्चेत आला आहे.

आपल्या प्रत्येक चित्रपटातून करोडोंची कमाई करणाऱ्या हृतिक रोशनने नुकताच एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्यामध्ये अभिनेत्याची आई (पिंकी रोशन) दिसत आहे. पण या फोटोमध्ये त्याच्या घराच्या भिंतीवर काहीसा ओलसरपणा दिसत आहे. यामुळे भिंतीचे नुकसान देखील झाले आहे. यामुळे काही लोक अभिनेत्याला ट्रोल करण्याचा प्रयत्न आहेत.

फोटोमुळे हृतिक रोशन चर्चेत?

Caknowledge.com च्या बातमीनुसार, अभिनेत्याची एकूण संपत्ती 370 दशलक्ष आहे. अशा परिस्थितीत, आता जेव्हा अभिनेत्याचा फोटो समोर आला आहे. चाहते त्याच्या घराच्या भिंतीवर दिसणाऱ्या ओलसरपणाबद्दल प्रश्न विचारत आहेत.

हा फोटो शेअर करताना हृतिकने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, आईसोबत लेझी ब्रेकफास्ट डेट दरम्यान… रविवारची फिलिंग बुधवारी देखील चांगली वाटते. आता तुम्ही पण एकदा तुमच्या आईला मिठी मारा…’

पाहा पोस्ट :

हृतिक रोशनच्या या फोटोत तो स्वत: मोबाईलवरून सेल्फी घेताना दिसत आहे आणि त्याची आई बाल्कनीत उभी असल्याचे दिसते. या फोटोमध्ये मागची भिंत देखील दिसत आहे, ज्यावर ओलसरपणामुळे भिंतीचे कपचे निघताना दिसत आहेत.

या फोटोवर हृतिकच्या एका चाहतीने कमेंट केली की, ‘हृतिक रोशन के घर सीलन?’ यावर चक्क अभिनेत्याने स्वतः उत्तर दिले आहे. यावर उत्तर देताना हृतिक म्हणाला, ‘सध्या भाड्याच्या घरात राहतो आहे. लवकरच मी माझे घर घेणार आहे.’

हृतिक रोशन सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. आपली माजी पत्नी सुझान, मुले आणि आईचे फोटो शेअर करत राहतो. बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन हा दोन मुलांचा पिता आहे. लॉकडाऊन दरम्यान, सुझान तिच्या दोन्ही मुलांच्या जवळ राहण्यासाठी हृतिकच्या घरी राहिली होती.

हृतिकचे आगामी चित्रपट

दुसरीकडे, वर्क फ्रंटबद्दल बोलायचे तर, हृतिक आणि दीपिका पदुकोण ‘फायटर’ चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. या व्यतिरिक्त, अशी बातमी आहे की, हृतिक सौरव गांगुलीच्या बायोपिकमध्येही त्याची भूमिका साकारू शकतो. सातत्याने असे म्हटले जात आहे की, लवकरच हृतिक रोशन सौरव गांगुलीच्या भूमिकेत मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.

हृतिक रोशनने दाखवल्या ‘बॉलिवूड बायसेप्स’

इंस्टाग्रामवरील आपल्या पोस्टमुळे हृतिक खूप चर्चेत आहे. केवळ चाहतेच नाही तर अनेक बॉलिवूड स्टार्सनीही या पोस्टवर कमेंट केल्या आहेत. ज्यात रणवीर सिंग, टायगर श्रॉफ यांनी कमेंट करण्यास अजिबात विलंब केलेला नाही. एवढेच नाही तर, त्याची माजी पत्नी सुझान खाननेही टिप्पणी केली. दरम्यान, टायगरने फायर इमोजीसह हृतिकच्या पोस्टचे कौतुक केले, तर रणवीरने ‘कडक’ म्हणत कमेंट केली आहे. तथापि, सर्वांचे लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे सुझानची कमेंट, जिने “wowzer !!” असे म्हणत त्याचे कौतुक केलेय.

नुकतीच शेअर केलेली इन्स्टाग्राम स्टोरी

अभिनेता हृतिक रोशन व्यस्त वेळापत्रकामध्ये देखील सोशल मीडियावर सक्रिय आहे. अलीकडेच त्याने त्याचा लेटेस्ट फोटो शेअर केला आहे. यासह, तो इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये चित्रपटांशी संबंधित फोटो आणि व्हिडीओ देखील शेअर करतात. आधीच्या पोस्टबद्दल बोलायचे तर, अभिनेत्याने त्याच्या स्टोरीवर लिहिले होते की, ‘अॅक्शनसाठी तयार राहा’ आणि ‘होय, पुढे जा आणि मला ठोसा मारा.’ हृतिक रोशन शेवट ‘वॉर’ या अॅक्शन चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत टायगर श्रॉफ मुख्य भूमिकेत दिसला होता. ‘फायटर’ हा चित्रपट देखील एक वॉर अॅक्शन चित्रपट असणार आहे आणि दीपिका पदुकोण त्यात हृतिकसोबत दिसणार आहे.

'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.