Hrithik Roshan | ऋतिक रोशन याने सांगितली मनातील खदखद, म्हणाला या अपेक्षांच्या ओझ्यामुळे…
सबा आणि ऋतिक यांच्या वयामध्ये मोठा फरक देखील आहे. अनेकदा ऋतिक रोशन आणि सबा आझाद हे स्पाॅट होतात.
मुंबई : बाॅलिवूड अभिनेता ऋतिक रोशन कायमच चर्चेत असतो. नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी ऋतिक रोशन हा गर्लफ्रेंड सबा आझाद आणि त्याच्या मुलांसोबत विदेशामध्ये गेला होता. सबा आझाद हिच्यासोबतचे फोटो कायमच ऋतिक रोशन सोशल मीडियावर शेअर करतो. मात्र, अनेकांना यांची जोडी अजिबातच आवडत नाही. सबा आणि ऋतिक यांच्या वयामध्ये मोठा फरक देखील आहे. अनेकदा ऋतिक रोशन आणि सबा आझाद हे स्पाॅट होतात. ऋतिक रोशनच्या अगोदर सबा आझाद ही नसीरुद्दीन शाह यांचा मुलगा इमाद शाह याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती.
काही दिवसांपूर्वी मुंबईतील एका हाॅटेलबाहेर इमाद शाह, ऋतिक रोशन आणि सबा आझाद हे स्पाॅट झाले होते. याचे अनेक फोटो आणि व्हिडीओही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. अनेकदा सोशल मीडियावर लोक सबा आझाद हिला ट्रोल देखील करतात.
नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमुळे आता ऋतिक रोशन हा चर्चेत आलाय. ऋतिक म्हणाला, स्टार असल्यामुळे लोकांच्या अपेक्षांचे ओझे आहे. लोक जेंव्हा काैतुक करतात तेंव्हा भारी वाटते. परंतू अपेक्षांचे ओझे देखील मोठे आहे.
ऋतिक म्हणाला, मुळात म्हणजे मी अत्यंत शांत आणि आरामदायी माणूस आहे. एक अभिनेता म्हणून माझी स्वत: ची जबाबदारी नक्कीच आहे. मला चुकीचे समजू नका…पण स्टारडम ही एक अशी गोष्ट आहे जी मी जपतो.
स्टारडम हे मला गिफ्ट मिळालेले आहे. परंतू माझ्यासाठी हे एक प्रकारचे ओझे नक्कीच आहे…जे मी वाहून नेले आणि ते टिकून ठेवण्यासाठी देखील मी खूप जास्त कष्ट घेतो.
याचे कारण म्हणजे लोकांच्यामध्ये मला राहायचे आहे आणि ते पुढे घेऊन देखील जायचे आहे. यावेळी ऋतिक रोशन याने त्याचा आवडता चित्रपट देखील सांगून टाकला असून ऋतिक म्हणाला, मला कहो ना प्यार है हा चित्रपट सर्वात जास्त आवडतो.