Krrish 4 | ‘क्रिश’ला 15 वर्ष पूर्ण, हृतिक रोशनची चाहत्यांना मोठी भेट, पाहा ‘क्रिश 4’ची झलक

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन (Hritik Roshan) याने ‘सुपरहीरो’ बनून सर्वांचे मन जिंकले आहे. त्याची ‘क्रिश’ सीरीजच्या चाहत्यांना खूपच आवडली होती. नुकतीच ‘क्रिश’ चित्रपट प्रदर्शित होऊन 15 वर्षे पूर्ण झाल्याच्या खास निमित्ताने हृतिक रोशनने आपल्या चाहत्यांना एक खास भेट दिली आहे.

Krrish 4 | ‘क्रिश’ला 15 वर्ष पूर्ण, हृतिक रोशनची चाहत्यांना मोठी भेट, पाहा ‘क्रिश 4’ची झलक
हृतिक रोशन
Follow us
| Updated on: Jun 24, 2021 | 10:29 AM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन (Hritik Roshan) याने ‘सुपरहीरो’ बनून सर्वांचे मन जिंकले आहे. त्याची ‘क्रिश’ सीरीजच्या चाहत्यांना खूपच आवडली होती. नुकतीच ‘क्रिश’ चित्रपट प्रदर्शित होऊन 15 वर्षे पूर्ण झाल्याच्या खास निमित्ताने हृतिक रोशनने आपल्या चाहत्यांना एक खास भेट दिली आहे. चाहते हृतिकच्या ‘क्रिश 4’ची (Krrish 4) आतुरतेने वाट पाहत होते. चाहत्यांकडून बर्‍याचदा अभिनेत्याला याबद्दल प्रश्न विचारले जातात. आता हृतिकने चाहत्यांची ही इच्छा पूर्ण करत ‘क्रिश 4’ची घोषणा केली आहे (Hritik Roshan announces Krrish 4 movie share special video).

हृतिक रोशनने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करुन याबाबत माहिती दिली आहे. व्हिडीओमध्ये हृतिक रोशनने ‘क्रिश’च्या नवीन मास्कची झलक दाखवली आहे, तसेच शेवटी असेही सांगितले गेले आहे की ‘क्रिश’ला 15 वर्षे पूर्ण झाली आहेत. पोस्ट शेअर करताना हृतिकने लिहिले की, ‘भूतकाळ संपला. भविष्यात काय होते ते पाहूया. क्रिश 4…’

पाहा हृतिक रोशनची पोस्ट

बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी हृतिक रोशनच्या या पोस्टवर कमेंट करत हृतिकचे अभिनंदन करत आहेत. टायगर श्रॉफने देखील यावर फायर इमोजी पोस्ट केले आहेत. त्याचवेळी एका चाहत्याने असे लिहिले की, तो या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे.

या सीरीजचा पहिला चित्रपट ‘कोई मिल गया’ होता, जो राकेश रोशन यांनी दिग्दर्शित केला होता. त्यानंतर त्यांनी ‘क्रिश’ आणि ‘क्रिश 3’ आणले. क्रिशमध्ये हृतिकबरोबर प्रियंका चोप्रा मुख्य भूमिकेत दिसली होती. चित्रपटाला 15 वर्षे पूर्ण झाल्यावर प्रियंका चोप्राने देखील पोस्ट शेअर केली होती. क्रिशचे फोटो शेअर करताना प्रियंकाने लिहिले की, ‘ज्या चित्रपटासह आपण 15 वर्षांपूर्वी प्रेमात पडलो. क्रिशला आज 15 वर्षे पूर्ण झाली आहेत. एक चित्रपट जो अॅक्शन, रोमान्स आणि भावनांनी परिपूर्ण होता.’

राकेश रोशन यांची घोषणा

फिल्ममेकर राकेश रोशन यांनी 2018 मध्ये ‘क्रिश 4’ची घोषणा केली होती. हा चित्रपट ख्रिसमस 2020मध्ये प्रदर्शित होणार असल्याचे त्यांनी म्हटले होते. पण कोरोनामुळे हे होऊ शकले नाही.

हृतिक रोशनने एका मुलाखतीत सांगितले होते की, वॉर चित्रपटाच्या रिलीजनंतर तो क्रिश 4चे चित्रीकरण करणार आहे. 2019 मध्ये वॉर हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. हृतिक म्हणाला होता की, वॉरनंतर मी माझ्या वडिलांसोबत यावर चर्चा करणार आहे आणि क्रिश 4वर काम करण्यास देखील सुरुवात करेन. ते आजारातून बरे होत असताना त्यांना आराम मिळावा म्हणून हा प्रोजेक्ट बाजूला ठेवण्यात आला होता.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, हृतिक रोशन लवकरच दीपिका पदुकोण सोबत ‘फायटर’ या चित्रपटात दिसणार आहे. यापूर्वीच त्याने या चित्रपटाची घोषणा केली आहे.

(Hritik Roshan announces Krrish 4 movie share special video)

हेही वाचा :

Photo : गंगूबाईपासून ते बेल बॉटमपर्यंत ‘या’ चित्रपटांची प्रेक्षकांना प्रतिक्षा, चित्रपटगृहात होणार रिलीज

TMKOC | ‘नट्टू काका’ फेम अभिनेता घनश्याम नायक यांची कर्करोगाशी झुंज, तरीही म्हणतात मला काम करायचंय!

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.