Hungama 2 Trailer | राजपाल यादवचं धमाकेदार पुनरागमन, शिल्पा शेट्टीच्या डान्ससह परेश रावलच्या कॉमेडीचा तडका, पाहा ‘हंगामा 2’चा ट्रेलर

विनोदाने ओतप्रोत या चित्रपटात शिल्पासोबत परेश रावल, मीझान जाफरी (Meezan Jafri), आशुतोष राणा (Ashutosh Rana), राजपाल यादव (Rajpal Yadav), जॉनी लिव्हर आणि प्रणिता सुभाष महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहेत.

Hungama 2 Trailer | राजपाल यादवचं धमाकेदार पुनरागमन, शिल्पा शेट्टीच्या डान्ससह परेश रावलच्या कॉमेडीचा तडका, पाहा ‘हंगामा 2’चा ट्रेलर
हंगामा 2
Follow us
| Updated on: Jul 01, 2021 | 2:34 PM

मुंबई :  बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि परेश रावल (Paresh rawal) यांच्या ‘हंगामा 2’ (Hungama 2) या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. विनोदाने ओतप्रोत या चित्रपटात शिल्पासोबत परेश रावल, मीझान जाफरी (Meezan Jafri), आशुतोष राणा (Ashutosh Rana), राजपाल यादव (Rajpal Yadav) आणि प्रणिता सुभाष महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहेत. या विनोदी चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. ज्यामध्ये परेश रावल यांचा विनोदी अंदाज सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य आणत आहे (Hungama 2 Trailer release Shilpa Shetty and Rajpal Yadav comeback on screen).

तीन मिनिटांच्या ट्रेलरच्या सुरूवातीलाच प्रणिता सुभाष आपल्याबरोबर एका लहान मुलीला घेऊन आली आहे. ती मीझानच्या घरी जाऊन आशुतोष राणाला सांगते की, तिचे आणि मीझानचे कॉलेजपासून एकमेकांवर प्रेम आहे आणि हे मूल या दोघांचेच आहे. त्यानंतर वकील म्हणजे प्रवेश परेश रावल यांची एन्ट्री होते आणि इथून सुरु होतो कॉमेडीचा धमाल ‘हंगामा’. या ट्रेलरमध्ये अभिनेते राजपाल यादव यांचीही भन्नाट एंट्री दिसली आहे.

पाहा ट्रेलर :

या चित्रपटात शिल्पा शेट्टी चक्क परेश रावल यांच्या पत्नीच्या भूमिकेत दिसली आहे. परेश रावल गोंधळून जातात की, मीझान त्यांची पत्नी शिल्पाचा प्रियकर आहे. परेश रावल यांचा हा गोंधळ पाहणाऱ्या प्रत्येकाच्या पोट धरून हसायला लावतो. आता हा गोंधळ कसा दूर होतो, यासाठी तुम्हाला चित्रपटाची प्रतीक्षा करावी लागेल.

‘हंगामा 2’ हा चित्रपट ‘हंगामा’ फ्रेंचायझीचा दुसरा चित्रपट आहे. अक्षय खन्ना, परेश रावल, आफताब शिवदासानी, रिमी सेन ‘हंगामा’मध्ये मुख्य भूमिकेत दिसले होते आणि हा सुपरहिट चित्रपट 2003 मध्ये प्रदर्शित झाला होता. ‘हंगामा 2’ थिएटरमध्ये नसून ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. हा चित्रपट 23 जुलैला डिस्ने प्लस हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. चाहते या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. प्रियदर्शन यांनी ‘हंगामा 2’चे दिग्दर्शन केले आहे. अक्षय खन्ना या चित्रपटात एक कॅमिओ करताना दिसणार आहे.

शिल्पाचे मोठ्या पडद्यावर पुनरागमन

अभिनेत्री शिल्पा शेट्टी तब्बल 13 वर्षानंतर ‘हंगामा 2’मधून चित्रपट विश्वात परतत आहे. ती अखेर 2007मध्ये आलेल्या ‘आप’ या चित्रपटात दिसली होती. शिल्पाच नव्हे तर राजपाल यादव देखील बॉलिवूडमध्ये पुनरागम करत आहेत. त्यामुळे या विनोदी धामालीची सगळेच चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

(Hungama 2 Trailer release Shilpa Shetty and Rajpal Yadav comeback on screen)

हेही वाचा :

Naseeruddin Shah Health Update | नसीरुद्दीन शाहंच्या तब्येतीत सुधारणा, लवकरच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार

Kareena Kapoor-Khan | बॉलिवूड करिअरला 21 वर्ष पूर्ण, करीना कपूरने खास video शेअर करत सांगितला पुढचा प्लॅन

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.