मुंबई : शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर धमाका करताना दिसत आहे. चित्रपटाने ओपनिंग डेलाही जबरदस्त कामगिरी केलीये. आता पठाण (Pathaan) चित्रपटाला रिलीज होऊन दहापेक्षाही अधिक दिवस झाले असताना देखील बाॅक्स आॅफिसवर पठाण चित्रपटाची हवा बघायला मिळत आहे. विशेष बाब म्हणजे फक्त देशामध्येच नाही तर विदेशातही पठाण चित्रपटाला प्रेक्षकांचे चांगले प्रेम मिळत आहे. ८०० कोटींचे जगभरातून कलेक्शन करण्यास शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट तयार आहे. शाहरुख खान याचा हा पठाण चित्रपट २५ जानेवारी रोजी रिलीज झालाय. चित्रपटाला विकेंडचा फायदा देखील झालाय. पठाण चित्रपटातील बेशर्म रंग हे गाणे रिलीज झाल्यापासून मोठ्या वादाला तोंड फुटले होते. यादरम्यान अनेकांनी शाहरुख खान याला जीवे मारण्याच्या धमक्या देखील दिल्या होत्या. बेशर्म रंग या गाण्यामध्ये दीपिका पादुकोण हिने भगव्या रंगाची बिकिनी घातल्यामुळे मोठा वाद झाला.
बेशर्म रंग गाणे रिलीज झाल्यापासून सातत्याने पठाण चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी सोशल मीडियावर करण्यात येत होती. देशामध्ये अनेक ठिकाणी पठाण चित्रपटाच्या विरोधात आंदोलने देखील करण्यात आली. मात्र, या दरम्यान शाहरुख खान याने काहीच भाष्य केले नाही.
प्रत्यक्षात चित्रपट रिलीज झाल्यानंतर या सर्व वादाचा फायदा हा पठाण चित्रपटालाच झाल्याचे दिसून आले. कारण पहिल्याच दिवशी चित्रपटाने जगभरातून १०० कोटींचे बाॅक्स आॅफिस कलेक्शन केले. पठाण या चित्रपटामध्ये शाहरुख खान याच्यासह दीपिका पादुकोण मुख्य भूमिकेत आहे.
संपूर्ण जगात पठाण चित्रपटाची चर्चा आहे. विशेष म्हणजे शाहरुख खान याची मोठी फॅन फाॅलोइंग पाकिस्तानमध्ये आहे. परंतू बाॅलिवूडचे चित्रपट पाकिस्तानमध्ये बॅन करण्यात आल्याने चाहत्यांना शाहरुख खान याचा पठाण चित्रपट बघायला मिळत नाहीये.
पाकिस्तानमध्ये जरी पठाण हा चित्रपट रिलीज झाला नसला तरीही काही दिवसांपूर्वी पाकिस्तानमधील दोन मोठी फेसबुक पेज कराचीमध्ये बेकायदेशीरपणे पठाणच्या स्क्रिनिंगची तिकिटे विकत असल्याचे समोर आले. इतकेच नाही तर याचे स्क्रीनिंग कराचीच्या व्हीआयपी परिसरात ठेवण्यात आले होते.
पाकिस्तानमध्ये बाॅलिवूडचे चित्रपट बॅन असताना देखील पठाण या चित्रपटाला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे तिकिट विक्रीवरून स्पष्ट झाले. पठाण चित्रपटाचे स्क्रिनिंग करणाऱ्या कंपनीचे नाव ‘फायरवर्क इव्हेंट्स’ असल्याचे समोर आले आहे.
पठाणच्या बेकायदेशीर स्क्रिनिंगबद्दल मीडिया रिपोर्ट्स समोर आल्यानंतर, सिंध फिल्म सेन्सॉर बोर्डाने फेसबुकवर खाजगी स्क्रीनिंगसाठी तिकीट विकण्यावर बंदी घातली आहे आणि चाैकशीचे आदेश दिले आहेत. म्हणजेच काय तर पाकिस्तानमध्ये जरी बाॅलिवूड चित्रपटाला बंदी असली तरीही लोक जुगाड करत पठाण हा चित्रपट पाहात आहेत.