Imran Khan: आमिर खानचा भाचा इम्रानचाही संसार मोडणार?

लग्नापूर्वी इम्रान (Imran Khan) आणि अवंतिका जवळपास आठ वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. 2011 मध्ये लग्न झाल्यानंतर 2014 मध्ये अवंतिकाने मुलीला जन्म दिला. इमारा असं तिचं नाव आहे.

Imran Khan: आमिर खानचा भाचा इम्रानचाही संसार मोडणार?
Imran Khan Avantika MalikImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 16, 2022 | 4:54 PM

अनेक दिवस चर्चांनंतर, निर्णयाबद्दल वारंवार पुनर्विचार केल्यानंतर, कुटुंबीय आणि जवळच्या व्यक्तींकडून समोपदेशन घेतल्यानंतर अखेर अभिनेता आणि आमिर खानचा भाचा इम्रान खान (Imran Khan) याने पत्नीपासून विभक्त होण्यावर शिक्कामोर्तब केल्याचं कळतंय. इम्रानने अवंतिका मलिकशी (Avantika Malik) लग्न केलं. हे लग्न वाचवण्यासाठी अवंतिकाने पुन्हा एकदा प्रयत्न करून पाहिलं, मात्र त्यात तिला यश मिळालं नाही. ‘ई टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार इम्रान आणि अवंतिका लवकरच विभक्त होणार आहेत. 2011 मध्ये या दोघांनी लग्नगाठ बांधली. या दोघांनी अद्याप घटस्फोटासाठी अर्ज केला नाही. त्यामुळे घटस्फोटाची (Divorce) कायदेशीर प्रक्रिया अद्याप सुरू झाली नाही. मात्र गेल्या दोन वर्षांपासून हे दोघं वेगवेगळे राहत आहेत.

लग्नापूर्वी इम्रान आणि अवंतिका जवळपास आठ वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. 2011 मध्ये लग्न झाल्यानंतर 2014 मध्ये अवंतिकाने मुलीला जन्म दिला. इमारा असं तिचं नाव आहे. इम्रानचे विवाहबाह्य संबंध हे दोघांच्या विभक्त होण्यामागचं मुख्य कारण म्हटलं जातंय. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री लेखा वॉशिंग्टन हिच्यासोबत त्याचं नाव जोडलं गेलं होतं. गेल्या वर्षी इम्रान आणि अवंतिका मुंबईत एका लग्नात एकत्र दिसले. त्यावेळी हे दोघं पुन्हा एकत्र येणार असल्याची चर्चा होती. मात्र आता दोघंही विभक्त होण्यावर ठाम असल्याचं समजतंय.

हे सुद्धा वाचा

पहा फोटो-

View this post on Instagram

A post shared by Imran Khan (@imrankhan)

इम्रानने 2008 मध्ये ‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर त्याने ‘किडनॅप’, ‘आय हेट लव्ह स्टोरी’, ‘डेल्ली बेली’, ‘गोरी तेरे प्यार में’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. 2015 मध्ये त्याचा ‘कट्टी बट्टी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. यामध्ये त्याने अभिनेत्री कंगना रनौतसोबत काम केलं होतं. मात्र त्यानंतर तो चित्रपटात झळकला नाही. इम्रानने अभिनयक्षेत्र सोडल्याचं त्याच्या एका मित्राने जाहीर केलं होतं. 2020 मध्ये अक्षय ओबेरॉयने एका मुलाखतीत इम्रानने अभिनय सोडल्याचं सांगितलं होतं.

मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.