Shah Rukh Khan | चौथ्या आठवड्यामध्येही फक्त पठाणचीच हवा, शाहरुख खान याच्या चित्रपटाने देशभरात कमावले इतके कोटी
विशेष म्हणजे पठाण चित्रपटाला रिलीज होऊन आता तब्बल 26 दिवस होऊन गेले आहेत. तरीही बाॅक्स आॅफिसवर पठाण चित्रपटाचीच हवा बघायला मिळत आहे.
मुंबई : शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर रेकाॅर्ड ब्रेक कामगिरी करताना दिसत आहे. आतापर्यंत या चित्रपटाने अनेक रेकाॅर्ड आपल्या नावे केले आहेत. विशेष म्हणजे बाहुबली 2 या चित्रपटाचा रेकाॅर्ड ही पठाणने तोडला आहे. पठाण (Pathaan) या चित्रपटाला फक्त भारतामध्येच नाही तर विदेशातही मोठे प्रेम मिळाले आहे. पठाण हा चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर बाॅलिवूडचे चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप जाताना दिसत होते. मात्र, पठाण चित्रपटाने तूफान कामगिरी नक्कीच केलीये. शाहरुख खान (Shah Rukh Khan) याने पठाण चित्रपटाच्या माध्यमातून तब्बल चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. शाहरुख खान याचे चाहते त्याच्या पुनरागमनाची सातत्याने वाट पाहात होते. शेवटी पठाण चित्रपटात शाहरुख खान हा अॅक्शन करताना दिसला. पठाण चित्रपटात सलमान खान (Salman Khan) याचीही झलक चाहत्यांना बघायला मिळाली. चार वर्षांनी शाहरुख खान अशाप्रकारे पुनरागमन करेल, अशी साधी कल्पनाही कोणी केली नसावी. कारण कोरोनानंतर बाॅलिवूडचे चित्रपट फ्लाॅप जात होते.
विशेष म्हणजे पठाण चित्रपटाला रिलीज होऊन आता तब्बल 26 दिवस होऊन गेले आहेत. तरीही बाॅक्स आॅफिसवर पठाण चित्रपटाचीच हवा बघायला मिळत आहे. 17 फेब्रुवारी रोजी कार्तिक आर्यन याचा शहजादा हा चित्रपट रिलीज झाला होता. मात्र, पठाण चित्रपटामुळे शहजादा मोठा फटका बसला आहे.
25 जानेवारी रोजी शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट रिलीज झालाय. तरण आदर्श यांनी नुकताच चौथ्या आठवड्यातील पठाण चित्रपटाच्या कमाईबद्दलचे अपडेट शेअर केले आहे. ही आकडेवारी पाहून तुमच्या लक्षात येईल की, पठाण चित्रपटाची जादू असूनही बाॅक्स आॅफिसवर आहे.
शाहरुख खान याच्या पठाण या चित्रपटाने चौथ्या आठवड्यातील शुक्रवारी 2.20 कोटी, शनिवारी 3.25 कोटी, रविवारी 4.15 कोटी आणि सोमवारी 1.20 कोटींची कमाई केली आहे. चौथ्या आठवड्यामध्येही पठाण चित्रपट धमाकेदार कामगिरी करताना दिसत आहे.
पठाण हा चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर मोठ्या वादाला तोंड फुटले होते. पठाण चित्रपटातील बेशर्म रंग गाणे रिलीज झाल्यानंतर वादाला निर्माण झाला होता. या गाण्यामध्ये दीपिका पादुकोण हिने भगव्या रंगाची बिकिनी घातली होती. बजरंग दल देखील या चित्रपटाला विरोध करताना दिसले होते. मात्र, या वादाचा काहीच तोटा चित्रपटाला झाला नसल्याचे दिसत आहे. चित्रपटाने जबरदस्त कामगिरी बाॅक्स आॅफिसवर केलीये.