Bholaa Collection | भोला चित्रपटाने केली तिसऱ्या आठवड्यामध्ये इतक्या कोटींची कमाई, अजय देवगण याचा जलवा कायम

बाॅलिवूड अभिनेता अजय देवगण याचा भोला हा चित्रपट काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये क्रेझ बघायला मिळत होती. मात्र, ओपनिंग डेला काही धमाका करण्यात चित्रपटाला काही यश मिळाले नाही. मात्र, आता चित्रपट धमाल करत आहे.

Bholaa Collection | भोला चित्रपटाने केली तिसऱ्या आठवड्यामध्ये इतक्या कोटींची कमाई, अजय देवगण याचा जलवा कायम
Follow us
| Updated on: Apr 17, 2023 | 6:01 PM

मुंबई : बाॅलिवूड अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या भोला या चित्रपटामुळे चर्चेत आहे. अजय देवगण याचा भोला हा चित्रपट राम नवमीच्या दिवशी रिलीज झाला. गेल्या काही दिवसांपासून अजय देवगण याचे चित्रपट बाॅक्स आॅफिसवर धमाका करताना दिसत आहेत. अजय देवगण याच्या भोला चित्रपटाकडून प्रेक्षकांना प्रचंड अपेक्षा नक्कीच होत्या. मात्र, या चित्रपटाला बाॅक्स आॅफिसवर (Box office) धमाल करण्यात यश मिळाले नाही. चित्रपटाची (Movie) ओपनिंगही खास ठरली नाही. आता अजय देवगण याच्या चित्रपटाच्या कमाईमध्ये वाढ बघायला मिळत आहे.

अजय देवगण हा भोला चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसला. विशेष म्हणजे शाहरूख खान याच्याप्रमाणे सोशल मीडियाच्या माध्यमातून भोला चित्रपटाचे प्रमोशन करताना अजय देवगण दिसला. अजय देवगण याने आपल्या चाहत्यांसाठी खास सेशनचे आयोजन केले होते. या सेशनमध्ये तो चाहत्यांच्या प्रश्नाला उत्तरे देताना देखील दिसला.

भोला चित्रपटाने तिसऱ्या विकेंडला जोरदार कमाई केलीये. भोला चित्रपटाने तिसऱ्या विकेंडला बाॅक्स आॅफिसवर 5.50 कोटींची कमाई केलीये. अजय देवगण याच्या भोला चित्रपटाने 18 दिवसांमध्ये 74.35 कोटींचे कमाई केली. भोला हा बिग बजेट चित्रपट असून हा चित्रपट तयार करण्यासाठी 100 कोटींचे बजेट लागले आहे.

आता सलमान खान याचा किसी का भाई किसी की जान हा चित्रपट 21 एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. सलमान खान याचा हा चित्रपट रिलीज झाल्यावर अजय देवगण याच्या भोला चित्रपटाच्या कमाईमध्ये मोठी घट होण्याची शक्यता आहे. सलमान खान याच्या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ बघायला मिळत आहे. शहनाज गिल ही किसी का भाई किसी की जान या चित्रपटातून बाॅलिवू़मध्ये पर्दापण करत आहे.

अजय देवगण याच्या भोला चित्रपटाची रिलीजच्या अगोदर चर्चा होती. मात्र, म्हणावा तसा प्रतिसाद चित्रपटाला मिळाला नाहीये. भोला चित्रपटाला बजेट काढणे देखील अवघड झाल्याचे वस्तुस्थिती आहे. त्यामध्येही सलमान खान याचा किसी का भाई किसी की जान हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर भोला चित्रपटाला मोठा फटका बसण्याची दाट शक्यता आहे.

अजय देवगण याचा मैदान हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अजय देवगण याच्या चित्रपटाला प्रेक्षकांचे प्रेम मिळत आहे. मैदान चित्रपटाच्या शूटिंगमध्ये अजय देवगण व्यक्त आहे. अजय देवगण याची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंगही सोशल मीडियावर बघायला मिळते.

कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.