KK Passes Away: केके यांच्या चेहऱ्यावर, ओठांवर जखमा; हॉटेलमध्ये गेल्यानंतर केली उल्टी; हॉटेल मॅनेजरची पोलिसांकडून चौकशी

केके यांच्या डोकं, चेहरा आणि ओठांवर जखमा आढळून आल्या असून, थोड्याच वेळात त्यांच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात येणार असल्याचं कळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केके यांनी हॉटेलवर पोहोचल्यानंतर उल्टीसुद्धा केली होती.

KK Passes Away: केके यांच्या चेहऱ्यावर, ओठांवर जखमा; हॉटेलमध्ये गेल्यानंतर केली उल्टी; हॉटेल मॅनेजरची पोलिसांकडून चौकशी
Singer KKImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jun 01, 2022 | 11:21 AM

कोलकातामधील (Kolkata) नजरुल मंच इथं मंगळवारी रात्री लाईव्ह शोदरम्यान प्रसिद्ध बॉलिवूड गायक केके (Singer KK) यांचं निधन झालं. कोलकाता पोलिसांनी याप्रकरणी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे. केके यांच्या निधनानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. केके यांच्या डोकं, चेहरा आणि ओठांवर जखमा आढळून आल्या असून, थोड्याच वेळात त्यांच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात येणार असल्याचं कळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केके यांनी हॉटेलवर पोहोचल्यानंतर उल्टीसुद्धा केली होती. पोलीस हॉटेलच्या शिफ्ट मॅनेजरचीही (Hotel Manager) चौकशी करत आहेत. केके यांचं निधन कार्डिअॅक अरेस्टने की दुसऱ्या कारणाने झालं, याचा तपास पोलीस करत आहेत. केके यांची पत्नी आणि मुलगा आज (बुधवार) सकाळी कोलकात्याला पोहोचले आहेत. कुटुंबीयांची संमती मिळाल्यानंतर चौकशी आणि शवविच्छेदन केले जाईल. कोलकाता इथल्या एसएसकेएम रुग्णालयात पोस्टमॉर्टमची व्यवस्था करण्यात येत आहे. मंगळवारी कोलकातामधल्या नजरूल मंच याठिकाणी केके यांचा लाईव्ह शो होता आणि याच शोदरम्यान त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर मृत घोषित करण्यात आलं.

हॉटेल मॅनेरजची पोलिसांकडून चौकशी

न्यू मार्केट ठाण्याच्या पोलिसांनी हॉटेलच्या शिफ्ट मॅनेजरची याप्रकरणी चौकशी केली आहे. केके हॉटेलमध्ये कधी आले, त्यांच्यासोबत कोण होतं, हॉटेलमधील रुममध्ये त्यांच्यासोबत कोण आलं याबाबतची माहिती मिळवण्यासाठी त्यांनी चौकशी केली. केके यांनी हॉटेलमध्ये काय खाल्लं होतं, याचीही चौकशी पोलिसांनी केली.

हे सुद्धा वाचा

हॉस्टिपलमध्ये नेण्याआधी स्टेजवर केकेसोबत काय घडलं?

पहा आणखी एक व्हिडीओ-

हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी करत आहेत. अखेरच्या क्षणी केके कोणासोबत होते आणि नेमकं काय झालं, याचा तपास पोलीस करत आहेत. केके यांना लाईव्ह शोदरम्यान अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्यांना आधी हॉटेलमध्ये नेण्यात आलं. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यामुळे हॉटेलच्या कर्मचाऱ्यांची चौकशी पोलिसांकडून करण्यात येत आहे.

मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.