Akshay Kumar : अक्षय कुमारचा फोटो बघून चिडले आयपीएस अधिकारी, म्हणाले- ‘असं होत नाही सर …’

अक्षय कुमारने त्याच्या 'सूर्यवंशी' चित्रपटाबद्दल एक ट्विट केलं, जे पाहून छत्तीसगडचे विशेष डीजीपी आर के विज थोडे 'चिडले'. मात्र खिलाडी कुमारने लवकरच IPS ची नाराजी दूर केली. (IPS officer gets angry after seeing Akshay Kumar's photo, says- 'This doesn't happen sir ...')

Akshay Kumar : अक्षय कुमारचा फोटो बघून चिडले आयपीएस अधिकारी, म्हणाले- 'असं होत नाही सर ...'
Follow us
| Updated on: Sep 26, 2021 | 4:02 PM

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी 22 ऑक्टोबर 2021 पासून राज्यभर चित्रपटगृह सुरू करण्याची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर केवळ सिनेप्रेमीच नाही तर कलाकार आणि चित्रपट निर्मातेही खूप आनंदी आहेत. आता पुढील महिन्यापासून बॉक्स ऑफिसवर (Box Office) धमाका होणार आहे. चित्रपट निर्माते रोहित शेट्टीने (Rohit Shetty) सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. यानंतर, अक्षय कुमारने (Akshay Kumar) त्याच्या ‘सूर्यवंशी’ (Suryavanshi) चित्रपटाबद्दल एक ट्विट केलं, जे पाहून छत्तीसगडचे विशेष डीजीपी आर के विज थोडे ‘चिडले’. मात्र खिलाडी कुमारने लवकरच IPS ची नाराजी दूर केली.

वास्तविक, अक्षय कुमारने एक ट्विट केलं. त्याने लिहिले, ‘आज अनेक कुटुंबे उद्धव ठाकरे यांचे आभार मानतील! 22 ऑक्टोबरपासून महाराष्ट्रातील चित्रपटगृहे पुन्हा सुरू करण्याची परवानगी दिल्याबद्दल आभारी आहोत. आता कोणीही थांबवणार नाही – पोलीस येत आहेत… ‘#Soooryavanshi #Diwali2021

Akshay Kumar

या ट्विटसह त्याने एक फोटो शेअर केला आहे, ज्यात अक्षय कुमार, अजय देवगण, रणवीर सिंह आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी दिसत आहेत. फोटोत स्पष्ट दिसत आहे की इन्स्पेक्टरची भूमिका करणारा रणवीर सिंह टेबलवर बसलेला आहे, तर अक्षय कुमार आणि अजय देवगण, जे वरिष्ठ अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहेत, मात्र ते दोघंही उभे आहेत.

अक्षय कुमारने ‘सूर्यवंशी’ बद्दल केले ट्विट 

हा फोटो पाहून डीजीपी आरके विज यांनी अक्षय कुमारचे हे ट्विट रिट्विट केले आणि एका कमेंटमध्ये लिहिले- ‘इन्स्पेक्टर साहेब बसले आहेत आणि एसपी साहेब उभे आहेत, ऐसी नहीं होता है जनाब.’

Akshay Kumar

अक्षयनं केला रिप्लाय

विशेष डीजीपी आर के विज यांच्या ट्विटला उत्तर देताना अभिनेता अक्षय कुमार म्हणाला- ‘जनाब, हे पडद्याच्या मागचे फोटो आहेत. आम्हा कलाकारांसाठी… कॅमेरा चालू होताच, आम्ही परत प्रोटोकॉलवर येतो. आमच्या महान पोलीस दलांना नेहमीच सलाम. आशा आहे की जेव्हा तुम्ही चित्रपट पाहाल तेव्हा तुम्हाला तो आवडेल.

aKSHAY kUMAR

आता अक्षयचे हे ट्विटही खूप व्हायरल होत आहे. आरके बिज हे 1988 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत आणि छत्तीसगडमध्ये विशेष डीजीपी म्हणून कार्यरत आहेत. आर के विज ट्विटरवर खूप सक्रिय आहेत आणि सर्व मुद्द्यांवर सतत ट्वीट करतात.

संबंधित बातम्या

Eksha Kerung : बॉक्सर, पोलीस अधिकारी आणि सुपर मॉडेल आहे ​​इक्षा केरुंग, असा आहे ‘एमटीव्ही सुपरमॉडेल’च्या मंचापर्यंतचा प्रवास

Shehnaaz Gill : सिद्धार्थ शुक्लाच्या अंत्यसंस्कारानंतर दिसली नाही शहनाज गिल, आता ‘या’ दिवशी दिसेल पहिली झलक!

Romantic Song : अभिनेता अक्षय वाघमारे पहिल्यांदाच झळकणार रोमँटिक गाण्यात, ‘हळवेसे’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.