Shenaz Treasury: ‘इश्क विश्क’ फेम अभिनेत्रीला फेस ब्लाइंडनेसचा विकार; ओळखू शकत नाही लोकांचे चेहरे

आपल्याला प्रोसोपॅग्नोशियाचं (prosopagnosia) निदान झाल्याची माहिती तिने नुकतीच इंस्टाग्राम स्टोरीमधून दिली. प्रोसोपॅग्नोशिया हा एक विकार असून त्यात लोकांना इतरांचे चेहरे ओळखण्यास अडचणी येतात. इन्स्टा स्टोरीमध्ये मोठी पोस्ट लिहित शेनाझने याविषयीची माहिती दिली.

Shenaz Treasury: 'इश्क विश्क' फेम अभिनेत्रीला फेस ब्लाइंडनेसचा विकार; ओळखू शकत नाही लोकांचे चेहरे
Shenaz TreasuryImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Jun 29, 2022 | 10:25 AM

2003 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘इश्क विश्क’ (Ishq Vishk) या चित्रपटातून अभिनेत्री शेनाझ ट्रेजरी (Shenaz Treasury) प्रकाशझोतात आली. या चित्रपटात तिने शाहीद कपूर आणि अमृता अरोरा यांच्यासोबत काम केलं होतं. काही चित्रपटांनंतर शेनाझने बॉलिवूडपासून दूर राहणं पसंत केलं. परंतु सोशल मीडियावर तिचे असंख्य फॉलोअर्स आहेत. आपल्याला प्रोसोपॅग्नोशियाचं (prosopagnosia) निदान झाल्याची माहिती तिने नुकतीच इंस्टाग्राम स्टोरीमधून दिली. प्रोसोपॅग्नोशिया हा एक विकार असून त्यात लोकांना इतरांचे चेहरे ओळखण्यास अडचणी येतात. इन्स्टा स्टोरीमध्ये मोठी पोस्ट लिहित शेनाझने याविषयीची माहिती दिली.

शेनाझने लिहिलं, “मला प्रोसोपॅग्नोशिया 2 चं निदान झालं आहे. आता मला समजलं की मी कधीही लोकांचे चेहरे का ओळखू शकले नाही. हा एक विकार आहे. मला नेहमीच लाज वाटायची की मला चेहरे ओळखता येत नाहीत. मी आवाजावरून लोकांना ओळखायचे.” दुसर्‍या स्लाइडमध्ये तिने लिहिलं, “प्रोसोपॅग्नोशियाची लक्षणे: 1- तुम्ही जवळचा मित्र किंवा कुटुंबातील सदस्याला ओळखू शकत नाही, विशेषत: जेव्हा तुम्ही त्यांना भेटण्याची अपेक्षा करत नसता. होय, ती मीच आहे. ती व्यक्ती कोण आहे हे कळण्यासाठी मला एक मिनिट लागतो. काहीवेळा अगदी जवळचा मित्र, ज्याला मी काही काळापासून पाहिलेला नसेल तर त्यालाही मी ओळखू शकत नाही.”

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ-

ती पुढे म्हणाली, “तुम्हाला शेजारी, मित्र, सहकर्मचारी, ग्राहक, शाळेतले मित्र ओळखण्यात अडचण येते. तुमच्या ओळखीचे लोक तुम्ही त्यांना ओळखावं अशी अपेक्षा करतात. एखाद्याला ओळखण्यात अडचण झाल्यामुळे तुम्हाला अलिप्त असल्यासारखं वाटू शकतं. माझ्या अनेक मित्रमैत्रिणींनी आणि सहकार्‍यांनी नाराजी व्यक्त केली, कारण मी त्यांना लगेच ओळखू शकत नव्हते. चित्रपट पाहतानाही जर त्यातील दोन पात्रांची उंची, केशरचना, शरीराचा बांधा सारखा असेल तर मी त्यातला फरक लगेच ओळखू शकत नाही. म्हणून आता कृपया समजून घ्या की ही एक खरी समस्या आहे.”

इश्क विश्क व्यतिरिक्त शेनाझने उमर, आगे से राइट, रेडिओ, लव का द एंड, डेल्ही बेली यांसारख्या काही चित्रपटांमध्ये काम केलंय. ती सध्या ट्रॅव्हल ब्लॉगर म्हणून काम करत आहे. युट्यूबवर ती तिचे फिरण्याचे विविध व्हिडीओ पोस्ट करत असते.

Non Stop LIVE Update
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.