कार्तिक आर्यन याच्यामुळे नव्हे तर अक्षय कुमार याच्यामुळेच भूल भुलैया 2 हिट? अभिनेत्याच्या चाहत्यांनी केला मोठा दावा

या दरम्यान अक्षय कुमार आणि आमिर खान यांच्यासारख्या स्टारचे चित्रपट फ्लाॅप गेले होते. यामुळेच कार्तिक आर्यन याच्या शहजादा या चित्रपटाकडून प्रचंड अपेक्षा होत्या. मात्र, प्रत्यक्षात या चित्रपटाला धमाका करण्यात यश मिळाले नाही.

कार्तिक आर्यन याच्यामुळे नव्हे तर अक्षय कुमार याच्यामुळेच भूल भुलैया 2 हिट? अभिनेत्याच्या चाहत्यांनी केला मोठा दावा
Follow us
| Updated on: Feb 20, 2023 | 2:27 PM

मुंबई : बाॅलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) याचा शहजादा हा चित्रपट 17 फेब्रुवारी रोजी रिलीज झालाय. मात्र, या चित्रपटाला तीन दिवसांमध्ये धमाका करण्यात यश मिळाले नाहीये. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून बाॅलिवूडचे चित्रपट बाॅक्स ऑफिसवर धमाका करू शकत नाहीयेत. अनेक बिग बजेटचे चित्रपट बाॅक्स ऑफिसवर फ्लाॅप गेले. याला फक्त कार्तिक आर्यन याचा भूल भुलैया 2, अजय देवगणचा दृश्यम 2 चित्रपट (Movie) आणि शाहरूख खान याचा पठाण अपवाद ठरले. ज्यावेळी बाॅक्स ऑफिसवर मोठ्या स्टारचे चित्रपट फ्लाॅप जात होते. त्यावेळी कार्तिक आर्यन याच्या भूल भुलैया 2 ने धमाका करत बाॅक्स ऑफिसवर जबरदस्त ओपनिंग केली. गेल्या काही वर्षांपासून कार्तिक आर्यन हा हिट चित्रपट देण्यासाठी सतत प्रयत्न करत होता. शेवटी भूल भुलैया 2 या चित्रपटाला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला. या दरम्यान अक्षय कुमार आणि आमिर खान यांच्यासारख्या स्टारचे चित्रपट फ्लाॅप गेले होते. यामुळेच कार्तिक आर्यन याच्या शहजादा या चित्रपटाकडून प्रचंड अपेक्षा होत्या. मात्र, प्रत्यक्षात या चित्रपटाला धमाका करण्यात यश मिळाले नाही.

शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट 25 जानेवारी रोजी रिलीज झालाय. या चित्रपटाच्या माध्यमातून शाहरुख खान याने तब्बल चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. चित्रपटाला रिलीज होऊन 25 दिवस झाले असतानाही या चित्रपटाची बाॅक्स ऑफिसवर जादू बघायला मिळत आहे.

ज्यादिवशी शहजादा हा चित्रपट रिलीज झाला, त्याचदिवशी पठाण चित्रपटाच्या तिकिटाच्या दरामध्ये मोठी कपात करून 110 रूपयांमध्ये तिकिट मिळत होते. इतकेच नाही तर सध्याही पठाण चित्रपटाच्या तिकिटाच्या दरात कपात करण्यात आलीये. यामुळे प्रेक्षकांनी शहजादाकडे पाठ फिरवत पठाण पाहणे पसंद केले.

शहजादा चित्रपटाचे बाॅक्स ऑफिस कलेक्शन बघता चित्रपटाचे बजेट काढणेही कार्तिक आर्यन याच्या चित्रपटाला अवघड असल्याचे दिसत आहे. आता लोकांनी भूल भुलैया 2 हा चित्रपट कार्तिक आर्यन याच्यामुळे नाही तर अक्षय कुमारमुळे हिट झाल्याचे म्हटले आहे. कारण भूल भुलैया 2 चित्रपटासमोर शहजादाची कमाई फारच कमी होताना दिसत आहे.

अक्षय कुमार याच्या मागील अनेक चित्रपटांचे निर्माते आता कार्तिकला त्यांची फ्रेंचायझी पुढे नेण्याचा पर्याय म्हणून विचार करत आहेत अशीही चर्चा होती. कार्तिक आर्यन याची फी अक्षय कुमार याच्यापेक्षा कमी आहे आणि बॉक्स ऑफिसवरही त्याची कमाई असल्याचे कारण देण्यात आले. मात्र, हे अक्षय कुमार याच्या चाहत्यांना हे आवडले नसल्याचे दिसत आहे.

'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.