Jacqueline Fernandez | ‘EOW’ च्या चाैकशीत फॅशन डिझायनरने केले मोठे खुलासे, जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणी वाढणार?
रिपोर्टनुसार EOW ने लिपाक्षीची तब्बल 7 तास चाैकशी केलीये. इतकेच नाही तर लिपाक्षीचे सर्व बँक डिटेल्सही EOW च्या अधिकाऱ्यांनी घेतले आहेत.
मुंबई : सुकेश चंद्रशेखरशी (Sukesh Chandrasekhar) संबंधित दररोज वेगवेगळे खुलासे होत आहेत. फक्त जॅकलिन फर्नांडिसच नाही तर बाॅलिवूडच्या अनेक अभिनेत्री सुकेशच्या संपर्कात होत्या. सुकेश हा अभिनेत्रींना महागडे गिफ्ट देत असल्याचे देखील समोर येतय. बुधवारी दिल्ली पोलिसांच्या (Delhi Police) आर्थिक गुन्हे शाखेने जॅकलिन फर्नांडिसची (Jacqueline Fernandez) फॅशन डिझायनर लिपाक्षीची चौकशी केली. लिपाक्षी आणि जॅकलिनला या अगोदर चाैकशीसाठी बोलावण्यात आले होते. मात्र, काही कारणांमुळे त्यावेळी लिपाक्षी हजर होऊ शकली नाही. EOW ला लिपाक्षी आणि जॅकलिनची समोरासमोर चाैकशी करायची होती.
जॅकलिन फर्नांडिसच्या समस्यांमध्ये होणार मोठी वाढ
रिपोर्टनुसार EOW ने लिपाक्षीची तब्बल 7 तास चाैकशी केलीये. इतकेच नाही तर लिपाक्षीचे सर्व बँक डिटेल्सही EOW च्या अधिकाऱ्यांनी घेतले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे सुकेशने लिपाक्षीच्या बँक खात्यात 1-2 लाख नव्हे तर तब्बल 3 कोटी रूपये ट्रान्सफर केले होते. लिपाक्षीला आता EOW ला प्रत्येक पैशांचा हिशोब देणे बंधनकारक ठरणार आहे. सुकेशने आपल्याला पैसे नेमके कोणत्या कारणासाठी पाठवले होते, याची महत्वाची माहिती लिपाक्षीने अधिकाऱ्यांना दिलीये.
फॅशन डिझायनरने चाैकशीत केले अत्यंत मोठे खुलासे
लिपाक्षीच्या म्हणण्यानुसार सुकेश चंद्रशेखरने हे सर्व पैसे जॅकलिन फर्नांडिसच्या डिझायनर कपड्यांसाठी पाठवले होते. लिपाक्षीने EOW ला सांगितले की, मला सुकेशने पाठवलेले पैसे कुठून आणि कोणत्या मार्गाने आले होते, याबद्दल किंचितही कल्पना कधीच नव्हती. लिपाक्षीची काल सात तास चाैकशी करण्यात आलीये. मात्र, जर EOW च्या अधिकाऱ्यांना गरज पडली तर ते लिपाक्षीला परत चाैकशीसाठी बोलावू शकतात, अशी माहिती मिळते आहे.