Janhvi Kapoor | स्टार किड्स जळतात, जान्हवी कपूर विरोधात संतापाची लाट, शहनाज गिल हिच्याकडे दुर्लक्ष करणे पडले महागात

| Updated on: Apr 18, 2023 | 2:28 PM

बाॅलिवूड अभिनेता सलमान खान हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या आगामी किसी का भाई किसी की जान या चित्रपटामुळे चर्चेत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करतानाही सलमान खान ही दिसत आहे. सलमान खान याचा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Janhvi Kapoor | स्टार किड्स जळतात, जान्हवी कपूर विरोधात संतापाची लाट, शहनाज गिल हिच्याकडे दुर्लक्ष करणे पडले महागात
Follow us on

मुंबई : किसी का भाई किसी की जान हा सलमान खान याचा चित्रपट 21 एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. विशेष म्हणजे सलमान खान (Salman Khan) याचा हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट (Movie) आहे. सलमान खान याच्या या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत. शाहरूख खान याच्या पठाण चित्रपटामध्ये सलमान खान याची झलक चाहत्यांना बघायला मिळाली होती. विशेष म्हणजे सलमान खान आणि शाहरूख खान यांना सोबत पाहून चाहते आनंदी झाले. गेल्या काही दिवसांपासून सलमान खान हा किसी का भाई किसी की जान (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे.

किसी का भाई किसी की जान या चित्रपटाच्या माध्यमातून शहनाज गिल ही देखील बाॅलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. किसी का भाई किसी की जान या चित्रपटातील अनेक गाणे रिलीज झाले आहेत. सलमान खान याचा लूक पाहून चाहत्यांमधील उत्साह वाढलाय. सलमान खान हा चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी काही दिवसांपूर्वी कपिल शर्मा याच्या शोमध्ये गेला होता.

फक्त शहनाज गिल हिच नाही तर श्वेता तिवारी हिची मुलगी पलक तिवारी ही देखील किसी का भाई किसी की जान या चित्रपटातून बाॅलवूडमध्ये पदार्पण करत आहे. शहनाज गिल हिला खरी ओळख ही बिग बाॅसमधून मिळालीये. बिग बाॅसमधून बाहेर पडल्यानंतर तिच्या फॅन फाॅलोइंगमध्येही मोठी वाढ झालीये. शहनाज सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय असते.

शहनाज गिल हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये शहनाज गिल, जान्हवी कपूर आणि पूजा हेगडे दिसत आहेत. हा व्हिडीओ पुरस्कार सोहळ्यातील असल्याचे सांगितले जातंय. हा व्हिडीओ पाहून शहनाज गिल हिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसलाय.

व्हिडीओमध्ये जान्हवी कपूर ही शहनाज गिल हिच्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे. जान्हवी कपूर ही पूजा हेगडे हिच्यासोबत बोलताना दिसत आहे. ज्यावेळी शहनाज ही जान्हवी कपूर हिला बोलते, त्यावेळी ती शहनाजकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे. आता हाच व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे.

एका युजर्सने या व्हिडीओवर कमेंट करत लिहिले की, हे स्टार किड्स स्वत: ला नेमके काय समजतात हेच कळत नाही. यांना फक्त नेपोटिझमच पाहिजे आहे. इतर कलाकार बाॅलिवूडमध्ये काम करतात हे स्टार किड्सला अजिबात आवडत नाही. दुसऱ्याने लिहिले की, स्टार किड्स शहनाज गिलवर जळतात. या व्हिडीओवर कमेंट करत शहनाज गिल हिचे चाहते जान्हवी कपूर हिला चांगलेच ट्रोल करताना दिसत आहेत.