ज्युनियर एनटीआर याच्यासोबत काम करण्यास बोनी कपूरची लेक उत्सुक, थेट जान्हवी कपूर म्हणाली…
जान्हवी कपूर कायमच चर्चेत राहते. काही दिवसांपूर्वीच जान्हवी कपूर हिच्या मिली हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटाला काही खास धमाका करण्यात यश मिळाले नाही. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना जान्हवी कपूर दिसली होती. विशेष म्हणजे या चित्रपटाची निर्मिती बोनी कपूर यांनी केली.
मुंबई : बोनी कपूर यांची लेक जान्हवी कपूर ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) हिचा मिली हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच रिलीज झालाय. मात्र, हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर (Box office) फ्लाॅप गेला. जान्हवी कपूर ही मिली चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसली होती. जान्हवी कपूर हिच्या मिली या चित्रपटाकडून प्रेक्षकांना प्रचंड अपेक्षा होत्या. मात्र, प्रत्यक्षात चित्रपटाकडे (Movie) प्रेक्षकांनी पाठ फिरवली. आता नुकताच जान्हवी कपूर हिने काही मोठे खुलासे केले आहेत. जान्हवी कपूर ही म्हणाली की, मी जे स्वप्न पाहिले आहे, ते आता काही दिवसांमध्ये पुर्ण होणार आहे.
जान्हवी कपूर ही गेल्या काही दिवसांपासून एनटीआर 30 चित्रपटामुळे चर्चेत आहे. ज्युनियर एनटीआर याच्यासोबत जान्हवी कपूर या चित्रपटात स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. ज्युनियर एनटीआर याच्यासोबत काम करणे माझे स्वप्न असल्याचे देखील जान्हवी कपूर हिने म्हटले आहे.
जान्हवी कपूर म्हणाली की, ज्युनियर एनटीआर याच्यासोबत काम करण्यासाठी मी प्रार्थना केल्या होत्या. शेवटी मला एनटीआर 30 चित्रपटामध्ये ज्युनियर एनटीआर याच्यासोबत काम करण्याची संधी मिळालीये. मी आता फक्त दिवस मोजत आहे. मी सतत चित्रपट निर्मात्यांना मेसेज करते. हे माझ्यासाठी एखाद्या स्वप्नासारखे नक्कीच आहे.
मी दोनदा आरआरआर हा चित्रपट बघितला आहे. मी खूप जास्त खुश असून मला ज्युनियर एनटीआर याच्यासोबत काम करण्याची संधी मिळालीये. ज्युनियर एनटीआर याच्यासोबत काम करण्यास मी खूप जास्त इच्छुक आहे. इतकेच नाहीतर पुढे जान्हवी कपूर म्हणाली की, मी अनेकदा संजय लीला भंसाळी यांनाही कामासाठी मेसेज करते.
मी बऱ्याच वेळा संजय लीला भंसाळी यांना म्हणाले की, माझे ऑडिशन घ्या आणि मला एकदा तुमच्या चित्रपटामध्ये काम करण्याची संधी द्या. मला काम मागायला काहीच वाटत नाही. सर्वजण इथे कामासाठीच आले आहेत. मी आतापर्यंत कितीतरी वेळा संजय लीला भंसाळी यांना म्हटले आहे की, सर प्लीज मला एकदा काम द्या. मला वाटत नाही की, मी इतरांपेक्षा वेगळी आहे.
जान्हवी कपूर हिची बहीण खुशी कपूर ही देखील काही दिवसांमध्येच बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. विशेष म्हणजे खुशी कपूर, सुहाना खान आणि अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा हे तिघे एकाच चित्रपटातून बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत.