Janhvi Kapoor | अखेर नेपोटिझमवर जाह्नवी कपूर हिने व्यक्त केली मनातील खदखद, म्हणाली मला लोक नेपोटिझमची मुलगी

अनुपम खेर यांचा ऊंचाई या चित्रपट रिलीज झाला होता आणि या चित्रपटाला प्रेक्षकांचे प्रेम मिळाले. जाह्नवी कपूर हिचा मिली हा चित्रपट फ्लाॅप गेल्यानंतर जान्हवी मालदीव येथे सुट्या घालवण्यासाठी काही दिवस गेली होती.

Janhvi Kapoor | अखेर नेपोटिझमवर जाह्नवी कपूर हिने व्यक्त केली मनातील खदखद, म्हणाली मला लोक नेपोटिझमची मुलगी
Follow us
| Updated on: Feb 09, 2023 | 3:34 PM

मुंबई : बोनी कपूर यांची लेक बाॅलिवूड अभिनेत्री जाह्नवी कपूर (Janhvi Kapoor) ही कायमच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी जान्हवी कपूर हिचा मिली हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना देखील जान्हवी कपूर दिसली होती. या चित्रपटाकडून जाह्नवी कपूर हिचा प्रचंड अपेक्षा होत्या. मात्र, प्रत्यक्षात हा चित्रपट (Movie) रिलीज झाल्यानंतर बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप गेला. जान्हवी कपूर हिचा मिली, सोनाक्षी सिन्हा हिचा डबल एक्सएल आणि कतरिना कैफ हिचा फोन भूत हे चित्रपट जवळपास एकदाच रिलीज झाले होते. मात्र, या तिन्ही चित्रपटाला बाॅक्स आॅफिसवर धमाका करण्यात यश मिळाले नाही. या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. या चित्रपटांनंतर दुसऱ्याच आठवड्यामध्ये अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि अनुपम खेर यांचा ऊंचाई या चित्रपट रिलीज झाला होता आणि या चित्रपटाला प्रेक्षकांचे प्रेम मिळाले. जाह्नवी कपूर हिचा मिली हा चित्रपट फ्लाॅप गेल्यानंतर जान्हवी मालदीव येथे सुट्या घालवण्यासाठी काही दिवस गेली होती.

मध्यंतरी सतत चर्चा रंगत होत्या की, जाह्नवी कपूर ही साऊथच्या एका मोठ्या चित्रपटामध्ये महत्वाच्या भूमिकेत असणार आहे. साऊथमध्ये जाह्नवी कपूर ही डेब्यू करणार आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी बोनी कपूर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत सांगितले की, जाह्नवी ही कोणत्याच साऊथच्या चित्रपटामध्ये सध्या डेब्यू करणार नाहीये.

जाह्नवी कपूर तिच्या चित्रपटातील पात्रासाठी प्रचंड मेहनत घेताना कायमच दिसते. मात्र, बऱ्याच वेळा कारणही नसताना तिला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. कधी कपड्यांमुळे तर कधी तिला नेपोटिझमवरून टार्गेट केले जाते.

नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये जान्हवी कपूर हिने नेपोटिझमवर मोठे भाष्य केले आहे, ज्यामुळे सध्या ती प्रचंड चर्चेत आहे. नेपोटिझमवर बोलताना जान्हवी म्हणाली की, तुम्ही काहीही करा… लोकांना तुमच्यात नेहमीच दोष दिसतो. हे पाहून खूप वाईट वाटतं…

कारण जेव्हा तुम्ही कामासाठी मेहनत करता, घाम गाळता, मानसिक आघातही अनेकदा सहन करता, पण लोक येतात आणि सहज म्हणतात की हिला अभिनय येत नाही तर ही काय करते, नेपोटिझमचा प्रोडक्ट…

जान्हवी कपूर पुढे म्हणाली की, अनेकदा लोक मला थेट नेपोटिझमची मुलगीच म्हणतात. यामुळे अनेकदा माझा आत्मविश्वास कमी होतो…काही लोक कधी चांगले विचारच करू शकत नाहीत…मला माझी ताकद आणि कमजोरी दोन्ही माहिती आहे…

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.