‘नवे वर्ष, नवा हर्ष’, जान्हवी कपूरचं ‘गुड लक जेरी’चं शूटिंग सुरु, पाहा खास लूक…

'धडक' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री जान्हवी कपूरच्या (Janhvi Kapoor) चाहत्यांसाठी एक मोठी बातमी आहे.

'नवे वर्ष, नवा हर्ष', जान्हवी कपूरचं ‘गुड लक जेरी’चं शूटिंग सुरु, पाहा खास लूक...
Follow us
| Updated on: Jan 11, 2021 | 4:54 PM

मुंबई : ‘धडक’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री जान्हवी कपूरच्या (Janhvi Kapoor) चाहत्यांसाठी एक मोठी बातमी आहे. ‘गुंजन सक्सेना’ या चित्रपटाच्या नंतर जाह्नवी कपूरने आजपासून तिच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे. येलो कलर प्रॉडक्शनच्या ‘गुड लक जेरी’ या चित्रपटातमध्ये जाह्नवी दिसणार आहे. या चित्रपटात काम करण्यासाठी जाह्नवी खूप उत्साही आहे. चित्रपटाची घोषणा करत प्रॉडक्शन हाऊसने जाह्नवीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. (Janhvi Kapoor’s new film ‘Good Luck Jerry’ has started shooting)

फोटो शेअर करताना लिहिले आहे की, कलर येल्लो 2021 मध्ये गुड लक जेरीचे स्वागत करत आहे. आमच्या चित्रपटाचे शूटिंग आजपासून सुरू झाले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक सिद्धार्थ सेन आहेत तर पंकज मत्ताने हा चित्रपट लिहिला आहे. या चित्रपटाचे निर्माते आनंद एल राय आहेत. या चित्रपटात दीपक डोबरियाल, जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

श्रीदेवी यांचा पुण्यतिथी निमित्ताने जान्हवी कपूर भावुक झाली होती. तिने सोशल मीडियावर भावूक कॅप्शन देत फोटो शेअर करत पोस्ट लिहिली होती. जान्हवीने आपल्या ईन्स्टाग्राम अकाऊंटवर ब्लॅक अँड व्हाईटमध्ये फोटो शेअर केला होता. तो फोटो पाहून तुम्ही अंदाज लावू शकता की, या फोटोमध्ये जान्हवी आणि श्रीदेवी आहे.

या फोटोमध्ये श्रीदेवी यांनी जान्हवीला आपल्या कुशीत घेतल्याचे दिसत होते. “माझं ह्रदय नेहमीच जड झालेलं असतं. पण मी चेहऱ्यावर हसू ठेवून वावरते. कारण माझ्या हृदयात तू राहतेस, अशी भावनिक पोस्ट तिने फोटोसोबत लिहिली होती. दरम्यान 24 फेब्रुवारी 2018 ला श्रीदेवी यांचे दुबईमध्ये एका हॉटेलमधील बाथरुममध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. अचानक झालेल्या या घटनेने संपूर्ण देश हळहळला होता. श्रीदेवींच्या चाहत्यांनाही या घटनेने धक्का बसला होता. आईच्या जाण्याने मला खुप धक्का बसला, अजूनही मी त्यातून बाहेर पडू शकली नाही”, असं जान्हवी कपूरने एका मुलखतीमध्ये सांगितले होते.

संबंधित बातम्या : 

डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विटर अकाउंट बंद, भडकलेल्या कंगनाचा ट्विटरच्या CEO वर निशाणा, म्हणते, ‘स्वार्थी सगळे’

हायकोर्टाचा सोनू सूदला मोठा दिलासा, 13 जानेवारीपर्यंत कारवाई न करण्याचे BMC ला आदेश

(Janhvi Kapoor’s new film ‘Good Luck Jerry’ has started shooting)

'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.