“लग्न घाण आणि बेकार गोष्ट”, जावेद अख्तर यांचे लग्नाबद्दलचे विधान ऐकून सगळेच शॉक
बॉलिवूडचे प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी लग्नाबाबत धक्कादायक मत व्यक्त केले आहे. त्यांच्या मते लग्न म्हणजे "घाण आणि बेकार" गोष्ट आहे.
बॉलिवूडमध्ये आपल्या लेखणीमुळे आणि बेधडक वक्तव्यांनी कायम चर्चेत असणारे गीतकार-पटकथाकार म्हणजे जावेद अख्तर. उत्कृष्ट सिनेमे आणि अशी अनेक गाणी लिहिली आहेत जी आजही लोकांच्या मनावर राज्य करत आहेत.
जावेद अख्तर हे कोणत्याही विषयावर अगदी रोखठोक भूमिका मांडतात. नुकतंच एका मुलाखतीत असंच बेधडक वक्तव्य आणि मत त्यांनी लग्नसंस्थेवर. बरखा दत्त यांच्या मोजो स्टोरी शोमध्ये जावेद अख्तर यांना लग्नसंस्थेवर प्रश्न वचारण्यात आला. तेव्हा त्यांना स्पष्ट शब्दात लग्न म्हणजे सर्वात खराब गोष्ट असल्याचे स्पष्ट केले.
“लग्न घाण आणि बेकार गोष्ट”
ते म्हणाले की, “लग्न-विवाह वगैरे एक बेकार गोष्ट आहे. ही एक खूप जुनी परंपरा आहे. हा एक असा दगड आहे जो गेली अनेक वर्ष डोंगरावरुन खाली ढकलला जातो. कारण लग्नासोबतच खूप कचरा, घाण आणि बेकार गोष्टी सोबत येतात. पती-पत्नीमध्ये एकमेकांविषयी सन्मान आणि समजुतदारपणा आहे का? उरतो तो फक्त हा प्रश्न. माणूस हा कोणत्याही जेंडरचा असला तरी आनंदी राहण्यासाठी एकमेकांची इज्जत, विचार जुळणं आणि एकमेकांना स्पेस देणं गरजेचं आहे.” असं म्हणत त्यांन लग्न म्हणजे एकप्रकारचं बंधन आणि कोडमारा असल्याचं स्पष्ट केलं.
“लग्नापेक्षा मैत्री महत्त्वाची”
जावेद अख्तर पुढे म्हणाले “एकमेकांना समजणं आणि मित्रांसारखं राहणं हा लग्नाचा खरा अर्थ आहे. नात्यांमध्ये त्या दोघांनाही स्वप्न आणि इच्छांना पूर्ण करण्याचा हक्क आहे. प्रेमामध्येही सन्मान असणं खूप गरजेचं आहे. एक स्वतंत्र महिला असेल तर तिच्यासोबत राहाणं सोप्पी गोष्ट नाहीये. माझं आणि शबानाचं लग्न होणं ही सोपी गोष्ट नव्हती. पण आम्ही एकमेकांचे चांगले मित्र आहोत. लग्नाचा पाया हा मैत्री आहे.”
असं म्हणत त्यांनी लग्न म्हणजे फक्त दोन माणसांनी एकत्र राहणे नाही तर एकमेकांचे साथी होणे आणि मुळात एकमेकांना न बदलणे म्हणजे प्रेम आणि लग्न असं त्यांनी सांगितलं आहे. पण जावेद यांच्या या वक्तव्यानंतर नक्कीच सर्वांच्याच भुवया उंचावल्या.
जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांची प्रेमकहाणी
जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांच्या प्रेमकहाणीबद्दल सांगायचे तर ,यांची पहिली ओळख शबाना आझमी यांच्या घरी झाली होती. 1970 साली जावेद अख्तर हे शबाना आझमी यांच्या घरी लेखनाचे धडे घेण्याची येत असते. शबाना या प्रसिद्ध शायर कैफी आझमी यांची मुलगी. जावेद अख्तर कवीता ऐकण्यासाठी देखील कैफी यांच्या घरी येत असत. आझमी कुटुंबीय आणि जावेद अख्तर यांच्यामध्ये चांगली मैफील रंगायची. शबाना देखील या सगळ्यात सहभागी व्हायच्या. याच काळात शबाना आणि जावेद अख्तर यांच्यामध्ये चांगली मैत्री झाली होती. त्यांच्या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले.
मात्र त्यावेळी जावेद यांचे आधीच लग्न झाले होते, त्यामुळे त्यांच्या प्रेमकथेत अनेक चढ-उतार आले. जेव्हा कैफी आझमी यांना दोघांच्या प्रेमाबद्दल कळले, तेव्हा ते खूप संतापले होते. जावेद यांचे केवळ लग्नच झाले नव्हते, तर त्यांना फरहान अख्तर आणि झोया अख्तर ही दोन मुलेही होती. अशावेळी आपल्या मुलीने कोणाचा संसार मोडू नये असे जावेद अख्तर यांना वाटत होते. तसेच जावेद यांची पहिली पत्नी हनी इराणी यांना या नात्याबद्दल समजल्यानंतर घरात रोज भांडणे होत होती.
पण जेव्हा हनीला लक्षात आले की, या नात्यात काहीच उरले नाही आणि भांडणे दिवसेंदिवस वाढत आहेत, तेव्हा त्यांनी जावेद अख्तर यांना दुसऱ्या लग्न करण्याची परवानगी दिली. यानंतर हनी यांनी लग्नाच्या सात वर्षानंतर जावेद अख्तर यांना घटस्फोट दिला. यानंतर शबाना आझमी यांनी 1984 मध्ये 10 वर्षांनी मोठ्या असलेल्या जावेद अख्तर यांच्यासोबत लग्न केले.