प्रियांका, कतरिना आणि आलिया, पहिल्यांदाच तीन अभिनेत्री जाणार रोड ट्रीपवर! पुढच्यावर्षी सुरु होणार ‘जी ले जरा’चा प्रवास!

बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्री प्रियांका चोप्रा-जोनास (Priyanka Chopra-Jonas), कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) एकत्र धमाल करायला मोठ्या पडद्यावर येत आहेत. या तिन्ही अभिनेत्री फरहान अख्तरच्या 'जी ले जरा' या चित्रपटात दिसणार आहेत.

प्रियांका, कतरिना आणि आलिया, पहिल्यांदाच तीन अभिनेत्री जाणार रोड ट्रीपवर! पुढच्यावर्षी सुरु होणार ‘जी ले जरा’चा प्रवास!
जी ले जरा
Follow us
| Updated on: Aug 10, 2021 | 3:27 PM

मुंबई : बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्री प्रियांका चोप्रा-जोनास (Priyanka Chopra-Jonas), कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) एकत्र धमाल करायला मोठ्या पडद्यावर येत आहेत. या तिन्ही अभिनेत्री फरहान अख्तरच्या ‘जी ले जरा’ या चित्रपटात दिसणार आहेत. मोशन पोस्टरसह चित्रपटाचे नाव जाहीर करण्यात आले आहे. या मोशन पोस्टरमध्ये एक गाडी दिसत आहे, ज्यावर अनेक ठिकाणची दृश्य दिसत आहेत.

‘दिल चाहता है’ आणि ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ नंतर पुढचा रोड ट्रिप चित्रपट सादर करताना, एक्सेल एंटरटेनमेंटच्या या जॉनरची कमान या वेळी मुली सांभाळणार आहेत. टायगर बेबीच्या सहयोगाने सादर होत असलेल्या या प्रोजेक्टचे नाव ‘जी ले जरा’ असून यामध्ये प्रियांका चोप्रा-जोनास (Priyanka Chopra-Jonas), कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) मुख्य भूमिकेत असणार आहेत.

या सोबतच, निर्मात्यांनी ही 2021साठीची सर्वात धमाकेदार घोषणा केली असून, याचे लेखन जोया अख्तर, फरहान अख्तर आणि रीमा कागती यांनी केले आहे. रीमा कागती, जोया अख्तर, रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर या चित्रपटची निर्मिती करत आहे. या चित्रपटाबाबतची आणखी एक खास गोष्ट ही आहे की, याचे दिग्दर्शन फरहान अख्तर करणार असून, हा चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे.

पाहा मोशन पोस्टर

खरोखरच, दोन दशकांनंतर ‘जी ले जरा’ची ही घोषणा, टाइगर बेबीच्या सहयोगाने एक्सेल एंटरटेनमेंटसाठी एका माइलस्टोनचे यश साजरे करण्याचा सर्वात रोमांचक भाग आहे.  कारण आणखी एका रोड ट्रिपची लोकप्रिय मागणी, चाहत्यांसाठी प्रत्यक्षात येणार आहे.

पहिल्यांदा प्रियांका, आलिया आणि कतरिना एकत्र काम करणार आहेत. या चित्रपटाद्वारे फरहान बऱ्याच काळानंतर चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. शेवटी त्याने शाहरुख खानचा डॉन 2 चित्रपट दिग्दर्शित केला.

व्यस्त अभिनेत्री!

‘जी ले जरा’ व्यतिरिक्त, आलियाकडे संजय लीला भन्साळींचा ‘गंगूबाई काठियावाडी’, एसएस राजामौलींचा ‘आरआरआर’, अयान मुखर्जीचा ‘ब्रह्मास्त्र’ आणि करण जोहरचा ‘रॉकी और रानी’ या चित्रपटांचा समावेश आहे.

तर, प्रियांका चोप्रा शेवटची 2019 मध्ये ‘द स्काय इज पिंक’ मध्ये दिसली होती आणि आता ती ‘जी ले जरा’मध्ये दिसणार आहे. त्याचबरोबर ‘जी ले जरा’ व्यतिरिक्त कतरिना कैफकडे ‘फोन भूत’ आणि ‘टायगर 3’ हे चित्रपट आहेत.

(Jee Le Zara First Look Out Alia Bhatt, Priyanka Chopra, Katrina Kaif Coming Together For ‘Road Trip’)

हेही वाचा :

 ‘बिग बॉस’च्या आलिशान घरात जाताच बदलला ‘भोजपुरी क्वीन’ अक्षराचा लूक!

‘संजू बाबा’ची लेक बिकिनी फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चेत, बॉलिवूडच्या बड्या अभिनेत्रींना टक्कर देतेय त्रिशाला दत्त!

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.