Jhund: “सेल्फी मीच काढतो”; थिएटरमध्ये नागराज मंजुळे, आकाश ठोसरची सरप्राइज एण्ट्री!

नागराज मंजुळे (Nagraj Manjule) दिग्दर्शित 'झुंड' (Jhund) हा चित्रपट 4 मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. अजूनही काही थिएटर्समध्ये या चित्रपटाचे शो हाऊसफुल आहेत. अशाच एका थिएटरमध्ये नागराज मंजुळे आणि अभिनेता आकाश ठोसर (Akash Thosar) यांनी सरप्राइज एण्ट्री करत चाहत्यांना खूश केलं.

Jhund: सेल्फी मीच काढतो; थिएटरमध्ये नागराज मंजुळे, आकाश ठोसरची सरप्राइज एण्ट्री!
Nagraj Manjule and Akash ThosarImage Credit source: Youtube
Follow us
| Updated on: Mar 14, 2022 | 4:47 PM

नागराज मंजुळे (Nagraj Manjule) दिग्दर्शित ‘झुंड’ (Jhund) हा चित्रपट 4 मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. अजूनही काही थिएटर्समध्ये या चित्रपटाचे शो हाऊसफुल आहेत. अशाच एका थिएटरमध्ये नागराज मंजुळे आणि अभिनेता आकाश ठोसर (Akash Thosar) यांनी सरप्राइज एण्ट्री करत चाहत्यांना खूश केलं. याचा व्हिडीओ युट्यूबवर पोस्ट करण्यात आला आहे. नागपुरातील समाजसेवक विजय बारसे यांनी केलेल्या यशस्वी प्रयोगावर या चित्रपटाची कथा बेतलेली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणारी झोपडपट्टीतील मुलांची फुटबॉल टीम त्यांनी तयार केली. यामध्ये बॉलिवूडचे महानायक अर्थात अमिताभ बच्चन हे मुख्य भूमिकेत आहेत. तर ‘सैराट’ फेम आकाश ठोसर, रिंकू राजगुरूसोबतच इतरही मराठी कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

‘आटपाट प्रॉडक्शन्स’च्या युट्यूब चॅनलवर पोस्ट करण्यात आलेल्या या व्हिडीओमध्ये नागराज आणि आकाश थिएटरमध्ये सरप्राइज एण्ट्री करताच खूश झालेले प्रेक्षक टाळ्यांचा कडकडाट करतात. ‘कसा वाटला सिनेमा, आवडला का’ असा प्रश्न नागराज यावेळी प्रेक्षकांना विचारतात. “मला बरं वाटलं की आज तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने इथे आलात. मी आताच यांच्याकडून माहिती घेतली की हा शो हाऊसफुल आहे. सदिच्छा तुम्हाला”, असं ते पुढे म्हणतात. ‘झुंड’च्या शोला थेट नागराज मंजुळेंनीच हजेरी लावली म्हटल्यावर प्रेक्षक त्यांच्यासोबत फोटो किंवा सेल्फीची संधी कशी सोडणार? तुमच्यासोबत एक सेल्फी काढायची आहे, असं त्यांनी विचारल्यावर नागराज म्हणाले, “सेल्फी मीच काढतो”. नागराज आणि आकाशने यावेळी थिएटरमध्ये उपस्थित असलेल्या प्रेक्षकांसोबत सेल्फी काढला.

‘झुंड’च्या मेकिंगचाही व्हिडीओ युट्यूबवर पोस्ट करण्यात आला आहे. नागपुराच्या गल्लीबोळातील शूटिंगची झलक या मेकिंगच्या व्हिडीओमध्ये दाखवण्यात आली आहे. नागराज यांच्या या चित्रपटाची शूटिंग कशी पार पडली, बिग बी सेटवर कसे वावरत होते याबद्दल अनेकांना कुतूहल होतं. ‘झुंड’ने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर 15 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर 9.3/10 इतकी आयएमडीबी रेटिंग या चित्रपटाला मिळाली आहे.

हेही वाचा:

‘द काश्मीर फाईल्सच्या टीमला शोमध्ये का बोलावलं नाही’ विचारणाऱ्यांना कपिल शर्माचं उत्तर

‘द काश्मीर फाईल्स’च्या कमाईत लक्षणीय वाढ; दुसऱ्या दिवशी जमवला इतक्या कोटींचा गल्ला

कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.