Jiah Khan Case | सीबीआय कोर्ट जिया खान प्रकरणाची सुनावणी करणार, सूरज पंचोलीला दिलासा मिळेणार?

जेव्हा बॉलिवूड अभिनेत्री जिया खानने (Jiah Khan) आत्महत्या केली, तेव्हा सर्वांनाच धक्का बसला होता. अभिनेत्री जिया खानच्या मृत्यूला आता 8 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे.

Jiah Khan Case | सीबीआय कोर्ट जिया खान प्रकरणाची सुनावणी करणार, सूरज पंचोलीला दिलासा मिळेणार?
जिया खान
Follow us
| Updated on: Jul 31, 2021 | 11:15 AM

मुंबई : जेव्हा बॉलिवूड अभिनेत्री जिया खानने (Jiah Khan) आत्महत्या केली, तेव्हा सर्वांनाच धक्का बसला होता. अभिनेत्री जिया खानच्या मृत्यूला आता 8 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. अशा स्थितीत आता जिया खान आत्महत्या प्रकरणात एक नवा ट्विस्ट आला आहे. आता या प्रकरणाची सुनावणी विशेष सीबीआय न्यायालयात होणार आहे. जियाच्या मृत्यूनंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. याशिवाय अभिनेता सूरज पांचोलीवरही अनेक प्रकारचे आरोप झाले होते.

आता सत्र न्यायालयाने, जे दिवंगत अभिनेत्रीचा कथित बॉयफ्रेंड आणि अभिनेता सूरज पांचोलीने आत्महत्येस प्रवृत्ती केल्याप्रकरणी खटला चालवत होते, ते म्हणाले की हा खटला आता सीबीआय न्यायालयात हस्तांतरित केला पाहिजे.

न्यायालयात असे म्हटले आहे की, सध्या प्रकरणाचा तपास सीबीआय / एससीबी करत आहे आणि त्यांनी पूरक आरोपपत्र दाखल केले आहे. अशा प्रकरणांमध्ये सीबीआय विशेषतः अशा प्रकरणांची चौकशी करते. आम्हाला वाटते की, हे प्रकरण सीबीआय न्यायालयात हस्तांतरित करणे आवश्यक आहे. बातमीनुसार, आता न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश हे प्रकरण सीबीआय न्यायालयाकडे सोपवणार आहेत.

जिया खानचे निधन

अभिनेत्री जिया खान हिचे निधन झाले, तेव्हा ती अवघी 25 वर्षांची होती. जिया खान 3 जून 2013 रोजी मुंबईतील तिच्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळली होती. अभिनेत्रीच्या मृत्यूनंतर तिच्या आईने म्हटले होते की, ही आत्महत्या नसून हत्या आहे. जियाच्या मृत्यूनंतर अभिनेत्रीचा प्रियकर आणि अभिनेता सूरज पांचोलीला आरोपी म्हणून पिंजऱ्यात उभे करण्यात आले होता.

10 जून 2013 रोजी सूरजला या प्रकरणात अटक करण्यात आली होती आणि त्यानंतर जुलैमध्ये त्याला जामीन मिळाला. सूरजवर अजूनही कलम 306 (आत्महत्येस प्रवृत्त करणे) अंतर्गत खटला सुरू आहे. आता 8 वर्षांनंतर, सीबीआय कोर्टाने या प्रलंबित प्रकरणाची सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. आता या प्रकरणात नवीन वळण आले आहे, तेव्हा आता हे प्रकरण सूरज पांचोलीला दिलासा देते की, त्याच्या अडचणी आणखी वाढवते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

(Jiah Khan Case CBI court to hear Jiah Khan case)

हेही वाचा :

‘बिग बॉस ओटीटी’ची पहिली स्पर्धक जाहीर, ‘ही’ सुप्रसिद्ध गायिका दिसणार BB15च्या घरात!

‘साकी-साकी’ गाण्याने प्रेक्षकांना घातली भुरळ, एका शस्त्रक्रियेमुळे उद्ध्वस्त झाले कोयना मित्राचे करिअर!

धर्माच्या भिंती ओलांडत एकमेकांशी लग्नगाठ बांधणारे दीपिका-शोएब, जाणून घ्या त्यांच्या प्रेमकथेबद्दल…

इंजिनिअर बनण्याची इच्छा असणारी वंदना तिवारी मुंबईत आली अन् गहना वशिष्ठ बनली! 

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.