मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री जिया खान (Jiah Khan) आत्महत्या प्रकरणाच्या पुढील तपासासाठी अभिनेता सूरज पांचोलीविरोधात केंद्रीय एजन्सीने दाखल केलेली याचिका सीबीआयच्या विशेष न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावली. या प्रकरणाची सुनावणी सध्या सुरू आहे. केंद्रीय अन्वेषण ब्युरोमध्ये जिया खानची आई राबिया खान यांनी हा खटला दाखल केला होता. दिवंगत अभिनेत्रीच्या आईची इच्छा आहे की, सूरज पांचोलीविरोधात पुन्हा एकदा चौकशी सुरू व्हावी.
अभिनेत्रीची आई राबिया खान यांचे म्हणणे आहे की, सूरजने जियाला ब्लॅकबेरी मेसेंजरद्वारे संदेश पाठवलेले आणि नंतर ते हटवले गेले, त्याचीही चौकशी झाली पाहिजे, एवढेच नाही तर तिला त्या दुपट्ट्याचीही पुन्हा तपासणी व्हावी असे वाटते, ज्याने तिने आत्महत्या केली होती. सीबीआयने चंदिगड सेंट्रल फॉरेन्सिक लॅबोरेटरीकडे दुपट्टा पाठवण्याच्या परवानगीसाठी आणि जप्त केलेले मोबाईल फोन अमेरिकेतील एफबीआयकडे पाठवण्यासाठी परवानगीसाठी डिसेंबर 2019 मध्ये अर्ज दाखल केला होता.
या प्रकरणात जिथे पांचोलीचे वकील प्रशांत पाटील म्हणाले होते की, “जेव्हा हे संपूर्ण प्रकरण उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात चालू आहे, मग माझ्या क्लायंटला वारंवार का त्रास दिला जात आहे? या प्रकरणाची सुनावणी झाल्यानंतर एएस सय्यद यांनी प्रकरण रद्द केले.’ जिया खान एक चर्चित बॉलिवूड अभिनेत्री होती. जिया खान, अमिताभ बच्चन, आमिर खान आणि अक्षय कुमार सारख्या स्टार्ससोबत चित्रपटांमध्ये दिसली आहे. जियाने 3 जून 2013 रोजी आत्महत्या केली होती. तर, आदित्य पांचोली याचा मुलगा अभिनेता सूरज पांचोली तिचा प्रियकर होता. जियाच्या मृत्यूनंतर या प्रकरणात सूरज पांचोलीचे नाव समोर आले होते. जेथे तपासानंतर, या प्रकरणात सूरजच्या विरोधात कोणतेही ठोस पुरावे सापडले नाहीत.
जियाची आई गेली 8 वर्षे न्यायासाठी लढा देत आहे. पण आजच्या काळात कोणीही तिच्या पाठीशी उभे राहत नाहीय. जिया खानने मनोरंजन विश्वात खूप कमी वयात नाव कमावले होते. अभिनेत्रीच्या मृत्यूनंतर जियाची आई सतत तिच्यासाठी न्यायाची मागणी करत आहेत. या संपूर्ण प्रकरणात आता काय नवीन ट्विस्ट येतो, हे पाहावे लागेल. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतरही राबिया खान यांनी जियासाठी आवाज उठवला. पण त्यावेळीही देखील त्यांना कोणीही साथ दिली नव्हती.
अभिनेत्री जिया खान हिचे निधन झाले, तेव्हा ती अवघी 25 वर्षांची होती. जिया खान 3 जून 2013 रोजी मुंबईतील तिच्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळली होती. अभिनेत्रीच्या मृत्यूनंतर तिच्या आईने म्हटले होते की, ही आत्महत्या नसून हत्या आहे. जियाच्या मृत्यूनंतर अभिनेत्रीचा प्रियकर आणि अभिनेता सूरज पांचोलीला आरोपी म्हणून पिंजऱ्यात उभे करण्यात आले होता.
10 जून 2013 रोजी सूरजला या प्रकरणात अटक करण्यात आली होती आणि त्यानंतर जुलैमध्ये त्याला जामीन मिळाला. सूरजवर अजूनही कलम 306 (आत्महत्येस प्रवृत्त करणे) अंतर्गत खटला सुरू आहे. आता 8 वर्षांनंतर, सीबीआय कोर्टाने या प्रलंबित प्रकरणाची सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला आहे.
ऋषी कपूर यांची अंगठी डिंपल कपाडियांच्या हातात दिसली अन् रागाने लालबुंद झाले राजेश खन्ना! वाचा किस्सा