सूरज पांचोली याच्या निर्दोष सुटकेनंतर जिया खान हिच्या आईचा मोठा निर्णय, आता पुढे राबिया खान या…

जिया खान प्रकरणात कोर्टाने आज अत्यंत मोठा निर्णय दिलाय. कोर्टाच्या निर्णयानंतर पांचोली कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण हे बघायला मिळत आहे. दुसरीकडे कोर्टाच्या निर्णयानंतर जिया खान हिची आई राबिया खान या दु:खी झाल्या आहेत. आता त्यांनी अत्यंत मोठा निर्णय घेतलाय.

सूरज पांचोली याच्या निर्दोष सुटकेनंतर जिया खान हिच्या आईचा मोठा निर्णय, आता पुढे राबिया खान या...
Follow us
| Updated on: Apr 28, 2023 | 3:36 PM

मुंबई : अभिनेत्री जिया खान मृत्यू प्रकरणात सूरज पांचोली (Sooraj Pancholi) याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. अभिनेता आदित्य पांचोली याचा मुलगा सूरत याच्यावर अनेक गंभीर आरोप या प्रकरणात करण्यात आले होते. शेवटी आज कोर्टाने (Court) अत्यंत मोठा निर्णय देत सुरज पांचोली याला निर्दोष मुक्तता केलीये. कोर्टाच्या निर्णयानंतर अनेकांना मोठा झटका बसलाय. हे प्रकरण गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू होते. एक नव्हे चार नव्हे तर तब्बल दहा वर्षांनी कोर्टाने या प्रकरणात आपला निकाल दिलाय. अभिनेत्री जिया खान (Jiah Khan) हिचा 3 जून रोजी 2013 रोजी मृत्यू झाला. या प्रकरणात सूरज पांचोली याचे नाव आल्याने अनेकजण सुरूवातीला हैराण झाले. या प्रकरणात दररोज मोठे खुलासे होताना दिसत होते.

कोर्टाच्या निकालानंतर आता जिया खान हिची आई राबिया खान ही दु:खी झालीये. कोर्टाच्या निकालानंतर त्यांनी थेट ही लढाई पुढे देखील लढणार असल्याचे म्हटले आहे. इतकेच नाही तर कोर्टाच्या निकालाचा सन्मान करत असल्याचे देखील जिया खान हिच्या आईने म्हटले आहे. आज सकाळीच सूरत पांचोली हा कोर्टामध्ये हजर झाला होता. मात्र, यावेळी त्याने माध्यमांना बोलणे टाळले.

जिया खान हिची आई राबिया खान म्हणाली की, मी सुरूवातीपासूनच सांगत आहे, ही केस आत्महत्येची नाहीच किंवा आत्महत्येसाठी उचकवण्याची देखील नाही. हे एक हत्येचे प्रकरण आहे. मी माझी लढाई ही पुढे सुरूच ठेवणार आहे. मी आता या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देणार आहे. मी एक आई आहे आणि मी माझ्या मुलीसाठी का नाही लढणार? मी माझ्या मुलीसाठी लढणार आहे.

जिया खान हिच्या प्रकरणात कोर्टाला आपला निर्णय देण्यासाठी तब्बल दहा वर्षांचा मोठा कालावधी लागलाय. मात्र, आता जिया खान हिच्या आईने स्पष्ट केले आहे की, मुलीला न्याय मिळावा, यासाठी आता त्या उच्च न्यायालयात धाव घेणार आहेत. यामुळे सूरज पांचोली याच्या समस्या अजूनही कमी झाल्या नसल्याचे आता स्पष्ट दिसत आहे.

जिया खान आत्महत्या प्रकरणात सूरज पांचोलीची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर आता त्याने पहिल्यांदाच सोशल मीडियावर यासंदर्भात मोठी प्रतिक्रिया दिलीये. सूरज पांचोली याने त्याच्या इस्टाग्रामवर स्टोरी शेअर केलीये. यामध्ये त्याने लिहिले की, सत्याचा नेहमीच विजय होतो. यासोबतच त्याने हात जोडून हर्टचा एक इमोजी देखील शेअर केलाय. आता ही पोस्ट सूरज पांचोलीची व्हायरल होताना दिसत आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.