“पावनखिंड पाहिला का?”; ‘झुंड’चं कौतुक करणाऱ्या जितेंद्र जोशीला नेटकऱ्याने प्रश्न विचारताच म्हणाला..

अभिनेता जितेंद्र जोशी (Jitendra Joshi) याने नागराज मंजुळे (Nagraj Manjule) दिग्दर्शित 'झुंड' (Jhund) हा चित्रपट पाहिला आणि तो या चित्रपटाच्या अक्षरश: प्रेमात पडला. चित्रपट पाहिल्यानंतर तीन दिवसांनी जितेंद्रने इन्स्टाग्रामवर लाईव्ह येत त्यावर प्रतिक्रिया दिली.

पावनखिंड पाहिला का?; 'झुंड'चं कौतुक करणाऱ्या जितेंद्र जोशीला नेटकऱ्याने प्रश्न विचारताच म्हणाला..
Jitendra joshi on Jhund and PawankhindImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 06, 2022 | 5:43 PM

अभिनेता जितेंद्र जोशी (Jitendra Joshi) याने नागराज मंजुळे (Nagraj Manjule) दिग्दर्शित ‘झुंड’ (Jhund) हा चित्रपट पाहिला आणि तो या चित्रपटाच्या अक्षरश: प्रेमात पडला. चित्रपट पाहिल्यानंतर तीन दिवसांनी जितेंद्रने इन्स्टाग्रामवर लाईव्ह येत त्यावर प्रतिक्रिया दिली. यावेळी त्याने नागराज यांच्या दिग्दर्शनाचं आणि चित्रपटातील कलाकारांच्या दमदार अभिनयाचं तोंडभरून कौतुक केलं. “मी सर्वांना कळकळीची विनंती करतो की त्यांनी कृपया आपल्या मुलांना हा चित्रपट दाखवा”, असं जितेंद्रने या लाईव्हमध्ये म्हटलं आहे. ‘झुंड’, ‘पावनखिंड’ आणि ‘गंगुबाई काठियावाडी’ या तीन चित्रपटांची सध्या बॉक्स ऑफिसवर टक्कर पहायला मिळतेय. जितेंद्र त्याच्या लाईव्हमध्ये ‘झुंड’चं कौतुक करत असतानाच एका नेटकऱ्याने त्याला पावनखिंडविषयी प्रश्न विचारला.

“पावनखिंड पाहिलास का?”

‘तू पावनखिंड पाहिलास का’, असा प्रश्न जितेंद्रला विचारला असता, तो म्हणाला, “पावनखिंड मला पहायचा आहे. मी गेल्या तीन वर्षांत पहिला जो सिनेमा जो थिएटरमध्ये पाहिलाय, तो म्हणजे झुंड. पावनखिंड पाहण्यासाठी परवा गेलो तर हाऊसफुल होता. मला सिनेमाची तिकिटं मिळाली नाहीत.” या इन्स्टा लाईव्हमध्ये जितेंद्रने नंतर नागराज यांनासुद्धा सहभागी करून घेतलं. “असा चित्रपट बनवून तू आमच्यावर उपकार करतोय. हा चित्रपट बनवताना पण तुला किती त्रास झाला, तुझं सेट पाडलं, हे सगळं मी जवळून पाहिलंय. पण चांगलं काम करत तू इथपर्यंत आला आहेत. आज मी तुझा सिनेमा पाहून तीन दिवस झाले, पण तसूभरही तो माझ्या मनातलं हलला नाही,” अशा शब्दांत त्याने नागराज मंजुळेंचं कौतुक केलं. ‘झुंड’बद्दल एक शब्द काय बोलशील असा प्रश्न एका नेटकऱ्याने विचारला. त्यावर जितेंद्र म्हणाला, “जबरदस्त, आरसा”. नागराजचा हा चित्रपट तुम्हाला आरसा दाखवतो, असं त्याने म्हटलंय.

“अमिताभ बच्चन यांनासुद्धा बच्चनगिरी करू दिली नाही”

अमिताभ बच्चन यांच्या भूमिकेबद्दल नागराजसमोर जितेंद्र म्हणतो, “तू बच्चनसाहेबांना बच्चनगिरी करूच दिली नाहीत. हे असं झालं, म्हणजे एखाद्या शार्पशूटरला बोलवायचं आणि त्याला सांगायचं की आता तुझा नेम सोडून बाकीचं सगळं वापर. सर्वसामान्य माणूस म्हणून त्यांना बघायची सवय नाही. पण त्यांच्याकडून ते तू करून घेतलंस. आपण त्यांना महानायक म्हणतो. महानायक आणि महामानवाला एका फ्रेममध्ये आणलंस आणि हे तूच करू शकतोस.”

नागपुरातील समाजसेवक विजय बारसे यांनी केलेल्या यशस्वी प्रयोगावर या चित्रपटाची कथा बेतलेली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणारी झोपडपट्टीतील मुलांची फुटबॉल टीम त्यांनी तयार केली. या कल्पनेत कितीही विरोधाभास असला तरी त्यांनी हा प्रयोग सत्यात उतरवला आहे. छाया कदम, किशोर कदम यांच्यासारखे कसलेले कलाकार, कलाकारांच्या नजरेतले भाव अचूक टिपणारी सुधाकर रेड्डी यांची सिनेमॅटोग्राफी आणि अजय-अतुल या जोडगोळीच्या संगीताची योग्य जोड या चित्रपटाला मिळाली आहे.

हेही वाचा: 

‘जात.. जात नाही तोवर…’; नागराज मंजुळेंच्या ‘झुंड’वर टीका करणाऱ्यांना केदार शिंदेंचं सडेतोड उत्तर

‘नागराज मंजुळे भावा.. त्या ओळी मनातून जातच नाहीत’; ‘झुंड’साठी सिद्धार्थने लिहिलेली पोस्ट वाचली का?

Non Stop LIVE Update
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.