‘झुंड’ पाहिल्यानंतर जितेंद्र जोशीची कळकळीची विनंती, स्वत:च्या मुलीला दाखवत म्हणाला..
नागराज यांचा पहिलाच बॉलिवूड चित्रपट Jhund हा 4 मार्च रोजी प्रदर्शित झाला. यामध्ये बॉलिवूडचे महानायक अर्थात अमिताभ बच्चन यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर जितेंद्र चित्रपटाच्या कथेच्या आणि त्यातील कलाकारांच्या दमदार अभिनयाच्या प्रेमात पडला आहे.
“नागराज मंजुळे (Nagraj Manjule) दिग्दर्शित ‘झुंड’ (Jhund) या चित्रपटाने आपल्याला आरसा दाखवला आहे. त्याच्या या चित्रपटासाठी एकच शब्द योग्य असेल ते म्हणजे.. जबरदस्त,” अशा शब्दांत अभिनेता जितेंद्र जोशीने (Jitendra Joshi) कौतुक केलं. नागराज यांचा पहिलाच बॉलिवूड चित्रपट 4 मार्च रोजी प्रदर्शित झाला. यामध्ये बॉलिवूडचे महानायक अर्थात अमिताभ बच्चन यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर जितेंद्र चित्रपटाच्या कथेच्या आणि त्यातील कलाकारांच्या दमदार अभिनयाच्या प्रेमात पडला आहे. इन्स्टाग्रामवर लाईव्ह येत जितेंद्रने या चित्रपटाचं भरभरून कौतुक केलं. या लाईव्हमध्ये त्याने नागराज मंजुळेंनाही सहभागी करून घेतलं. “चित्रपटाची भावना ही शेवटपर्यंत तुमच्या मनात कायम राहते. झुंडमध्ये फक्त उपदेशाचे डोस नाहीत तर हा चित्रपट तेवढाच एंटरटेनिंग पण आहे,” असं त्याने म्हटलंय. यासोबतच त्याने सर्व चाहत्यांना एक कळकळीची विनंती केली आहे.
जितेंद्र जोशीची कळकळीची विनंती-
“नागराज आणि त्याच्या टीमने जबरदस्त काम केलंय. अनेक वर्षं मी असं काम पाहिलंच नाही. ही जी माझी मुलगी बसली आहे इथे आणि एखाद्या झोपडपट्टीतली मुलगी, यांच्यामध्ये काय फरक असेल? तिची आईसुद्धा तिला प्रेमाने खाऊपिऊ घालत असेल, ज्यापद्धतीने मी हिला करतो. मी कळकळीची विनंती करतो सगळ्यांना, कृपया आपल्या मुलांना हा सिनेमा दाखवा,” असं तो या व्हिडीओत म्हणतो.
View this post on Instagram
नागराजची सगळ्यात गेट्रेस्ट गोष्ट काय?
नागराजबद्दल बोलताना जितेंद्र म्हणतो, “सगळ्यात गेट्रेस्ट गोष्ट काय नागराजची की, त्याच्या प्रत्येक कवितेत त्याचं जगणं आलंय पण ती कविता एक लाखनं गुणून त्यानं पडद्यावर आणली आणि त्यानं ती दाखवली कविता. आणि ती कविता आपली होते. त्यानं फँड्री केला होता ना, तेव्हा अनेक लोकांना मागे लागून, बघा बघा फँड्री बघा. तर मला असं सांगितलं की , डुकराच्या मागे जाणाऱ्या माणसाची काय कथा असते व्हय. पण त्याचं जगणं आहे ना मग. म्हणजे तो जगलाय, तो जगत असताना तुम्ही ते जगणं त्याला दिलंत समाजाने. त्याच्या जगण्याविषयी तो आता भाष्य करतोय तर तेही तुम्हाला नाही चालत होय. बरं आणखी एक गोष्ट करायला लागला ना तो. त्याचा बिजनसही करायला लागला. बरं त्याचे पैसे असतात ना. सेट लावायला. अमिताभ बच्चन काय फुकट काम करत असन का? त्या सैराटनं एवढे पैसे मिळवून दिले इंडस्ट्रीला. मग सैराटनंतर काय नागराजय, अरारारा. नाही तो हे सगळे ठोकताळे बाजुला ठेवतो आणि सिनेमा बनवतो. झुंड पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल.”
हेही वाचा:
“पावनखिंड पाहिला का?”; ‘झुंड’चं कौतुक करणाऱ्या जितेंद्र जोशीला नेटकऱ्याने प्रश्न विचारताच म्हणाला..
‘आग ऐसी लगाई मजा आ गया’ नागराज मंजुळेंच्या ‘झुंड’वरील हे Memes पोट धरून हसवतील!