Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शाहरुख-दीपिकापेक्षा मोठा झाला झाला जॉन अब्राहम? पठानच्या शूटिंगसाठी तारीखच देईना…!

शाहरुख खानचा चित्रपट पठाणची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करीत आहेत, ज्यांनी यापूर्वी वॉरसारखे सुपरहिट चित्रपट केले आहेत.

शाहरुख-दीपिकापेक्षा मोठा झाला झाला जॉन अब्राहम? पठानच्या शूटिंगसाठी तारीखच देईना...!
Follow us
| Updated on: Jan 31, 2021 | 12:32 PM

मुंबई : शाहरुख खानचा चित्रपट पठाणची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करीत आहेत, ज्यांनी यापूर्वी वॉरसारखे सुपरहिट चित्रपट केले आहेत. पठाण हा चित्रपट एक मोठा मल्टीस्टारर चित्रपट मानला जात आहे. या चित्रपटात शाहरुख खानसोबत सलमान खान, दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहमही दिसणार आहेत. मात्र, जॉन अब्राहमला पठाण चित्रपटाचे शूट पूर्ण करण्यासाठी वेळ मिळत नाहीये. जॉन अब्राहम सध्या दिल्लीत आहे. दोन दिवसांपूर्वी मुंबईत त्याने आगामी चित्रपट ‘सत्यमेव जयते’ चे शूटिंग पूर्ण केले आहे. जॉनसाठी, 2018-2019 हे एक अतिशय चांगले गेले कारण त्याचे 2 मोठे चित्रपट प्रदर्शित झाले होते. (John Abraham doesn’t get time to shoot the movie Pathan)

ज्यानंतर आता जॉन 2021 मध्ये पुनरागमन करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. पिंकविल्लाच्या रिपोर्टनुसार जॉन आपल्या पुढच्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी सेटवर परत आला आहे. सत्यमेव जयते’चे शूटिंग संपवून तो आता दिल्लीत आगामी‘अटॅक’ चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. जॉन या चित्रपटाचे शूटिंग दिल्लीत पूर्ण करणार आहे. जॉनला या चित्रपटाचे शूटिंग फेब्रुवारीमध्येच संपावे लागणार आहे कारण त्यांच्यानंतर त्याला त्याच्या आगामी चित्रपटांचे शूटिंग करायचे आहे.

जॉनचे चित्रपटांच्या शूटिंगचे वेळापत्रक ऐवढे जास्त व्यस्त आहे की, त्याला शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाच्या शूटिंगसाठी वेळ मिळत नाहीये. रिपोर्टनुसार जॉन मार्चमध्ये शाहरुख आणि दीपिकासमवेत दुबईला जाणार आहे, जेथे तो पठाणचे शेवटचे वेळापत्रक पूर्ण करेल. त्याचबरोबर हेही बोलले जात आहे की, पठाण चित्रपटाचे शूट जॉनमुळेच लांबीवर पडत आहे. कारण जॉनने चित्रपटाचे शूटिंग अजून सुरू केलेले नाही.

हृतिक रोशन देखील पठाण चित्रपटात दिसू शकतो. असे सांगितले जात आहे की, चित्रपटात हृतिकलाही कास्ट केल्याची चर्चा आहे. या वृत्तानुसार, सिद्धार्थने हृतिकबरोबर ‘वॉर’ चित्रपटात काम केले आहे आणि त्याच वेळी त्याने ‘पठाण’ मध्ये कबीरच्या भूमिका करण्याविषयी हृतिक अॅफरही दिली असल्याचे बोलले जात आहे. अशा परिस्थितीत जर सर्व काही ठीक झाले तर हृतिकही या चित्रपटात दिसू शकतो.

संबंधित बातम्या : 

कतरिनामुळे माझं करियर बरबाद झालं, जरीन खानचा आरोप!

रागीट तैमुर आता शांत झाला, फोटोग्राफरला आता हाय हॅलो करतो…!

So Expensive | नोरा फतेहीच्या ‘या’ ड्रेसची किंमत ऐकल्यानंतर बसेल धक्का!

(John Abraham doesn’t get time to shoot the movie Pathan)

कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार
कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार.
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण...
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण....
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही..
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही...
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?.
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे...
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे....
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?.
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?.
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी.
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात.
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती.