Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जुही चावला अचानक बनली भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेत्री, जाणून घ्या तिची संपत्ती

अभिनेत्री जुही चावला हिने अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केले आहे, शाहरुख खान आणि तिची जोडी अनेकदा पडद्यावर हिट ठरली आहे. सध्या जुही चावला तिच्या संपत्तीमुळे चर्चेत आली आहे, जुही चावलाची संपत्ती ही सर्व अभिनेत्रींपेक्षा जास्त आहे. तिने याबाबतीत सर्वांना मागे टाकलं आहे.

जुही चावला अचानक बनली भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेत्री, जाणून घ्या तिची संपत्ती
Follow us
| Updated on: Oct 19, 2024 | 10:03 PM

बॉलिवूडची 90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री जुही चावला सध्या तिच्या संपत्तीमुळे चर्चेत आलीये. जुही चावला आता फिल्मी दुनियेपासून खूपच लांब गेली आहे. पण असं असलं तरी तिने एका गोष्टीत दीपिका पदुकोण, आलिया भट्ट आणि प्रियांका चोप्रा सारख्या दिग्गज अभिनेत्रींना मागे टाकले आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, जुही चावला आता भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेत्री बनली आहे. 2024 च्या हुरुन रिच लिस्टचा हवाला देऊन, टाइम्स ऑफ इंडिया पोर्टलने वृत्त दिले की, प्रियांका चोप्रा, आलिया भट्ट आणि दीपिका पदुकोण यांना मागे टाकत जुही चावला भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेत्री बनली आहे.

जुहीची संपत्ती किती?

जुही चावलाची एकूण संपत्ती 4600 कोटी रुपये आहे. त्या तुलनेत शाहरुख खानची संपत्ती 7,300 कोटी रुपये आहे. नवीन अहवालानुसार, शाहरुख हा भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेता आहे तर जुही दुसऱ्या स्थानावर आहे, त्यानंतर हृतिक रोशन तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याची संपत्ती 2000 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.

शाहरुख खानसोबत भागीदारी

जुही चावलाला आणि शाहरुख खान यांची रेड चिलीज ग्रुपसोबत भागीदारी आहे. शाहरुख खान आणि जुही चावला यांनी सोबत निर्मिती कंपनी स्थापन केली आहे. याशिवाय जूही इंडियन प्रीमियर लीगमध्ये शाहरुखसोबत कोलकाता नाइट रायडर्सची सहमालक देखील आहे. याशिवाय जुहीची संपत्ती तिचा रिअल इस्टेट पोर्टफोलिओ आणि तिचा पती जय मेहता यांच्यासोबत केलेली गुंतवणुकीतून देखील येते.

या यादीत जुही चावलाशिवाय इतर चार अभिनेत्रींचीही नावे आहेत. ऐश्वर्या राय, प्रियांका चोप्रा, आलिया भट्ट आणि दीपिका पदुकोण. या अभिनेत्रींबद्दल बोलायचे झाले तर, ऐश्वर्या राय ही भारतातील दुसरी सर्वात श्रीमंत अभिनेत्री आहे, जिची संपत्ती 850 कोटी रुपये आहे. प्रियांका चोप्रा 650 कोटी रुपयांच्या संपत्तीसह तिसरी सर्वात श्रीमंत अभिनेत्री आहे. तर आलिया भट्ट 550 कोटी रुपयांच्या संपत्तीसह चौथी सर्वात श्रीमंत अभिनेत्री आहे. 400 ते 500 कोटी रुपयांच्या संपत्तीसह दीपिका पदुकोण पाचव्या क्रमांकाची श्रीमंत अभिनेत्री आहे.

सभागृहाची ऐसी तैसी करायचं काम सुरू आहे; जयंत पाटील संतापले
सभागृहाची ऐसी तैसी करायचं काम सुरू आहे; जयंत पाटील संतापले.
लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी, लाभार्थ्यांना कधी मिळणार 2100 रूपये?
लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी, लाभार्थ्यांना कधी मिळणार 2100 रूपये?.
'वा लगे रहो चित्रा ताई, तुमच्यासारख्या वाघिणींची गरज'; राणेंकडून कौतुक
'वा लगे रहो चित्रा ताई, तुमच्यासारख्या वाघिणींची गरज'; राणेंकडून कौतुक.
सरकारमधीलच कोणीतरी मुख्यमंत्र्यांना खाली ओढण्याचा प्रयत्न करतंय
सरकारमधीलच कोणीतरी मुख्यमंत्र्यांना खाली ओढण्याचा प्रयत्न करतंय.
असं बोलणं म्हणजे...,कडूंची चित्रा वाघ यांच्या त्या वक्तव्यानंतर नाराजी
असं बोलणं म्हणजे...,कडूंची चित्रा वाघ यांच्या त्या वक्तव्यानंतर नाराजी.
निलेश राणे - भास्कर जाधव आपापसात भिडले
निलेश राणे - भास्कर जाधव आपापसात भिडले.
कधीकाळी या बाई ठाकरेंकडे पक्षप्रवेशासाठी धडपडत होत्या; अंधारेंचा टीका
कधीकाळी या बाई ठाकरेंकडे पक्षप्रवेशासाठी धडपडत होत्या; अंधारेंचा टीका.
तुम्ही HSRP नंबर प्लेट लावली का? अजून नसेल लावली तर नो टेन्शन, कारण...
तुम्ही HSRP नंबर प्लेट लावली का? अजून नसेल लावली तर नो टेन्शन, कारण....
बाईंचा तसा तो नादच आहे..;चित्रा वाघ यांच्यावर सुषमा अंधारेंची फटकेबाजी
बाईंचा तसा तो नादच आहे..;चित्रा वाघ यांच्यावर सुषमा अंधारेंची फटकेबाजी.
लक्षवेधीवरून सभागृहात विरोधकांचा गदारोळ
लक्षवेधीवरून सभागृहात विरोधकांचा गदारोळ.