कबीर खानला 83 चित्रपटानंतर पुन्हा रणवीर सिंहसोबत काम करायचे आहे, नवीन आयडिया असेल खास!

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) सध्या त्याचा आगामी चित्रपट 83 च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट 24 डिसेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात 1983 मध्ये जिंकलेल्या वर्ल्ड कपच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या होणार आहेत.

कबीर खानला 83 चित्रपटानंतर पुन्हा रणवीर सिंहसोबत काम करायचे आहे, नवीन आयडिया असेल खास!
कबीर खान आणि रणवीर सिंह
Follow us
| Updated on: Dec 19, 2021 | 2:05 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) सध्या त्याचा आगामी चित्रपट 83 च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट 24 डिसेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात 1983 मध्ये जिंकलेल्या वर्ल्ड कपच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या होणार आहेत. कबीर खानने (Kabir Khan) या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

कबीर खान, रणवीर सिंहसह संपूर्ण टीम या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहे. 83 मध्ये रणवीर सिंहसोबत काम केल्यानंतर कबीर खानला पुन्हा एकदा त्याच्यासोबत काम करायचे आहे. कबीर खान हे रणवीरसोबत आणखी एका चित्रपटाबद्दल बोलत आहेत. म्हणजे चाहत्यांना परत एकदा कबीर आणि रणवीरची जोडीसोबत काम करताना दिसणार आहे.

रणवीरसोबत काम करायचे आहे

बॉलिवूड हंगामासोबतच्या एका खास कार्यक्रमामध्ये कबीर खानला विचारण्यात आले की, तो रणवीरसोबत आणखी एक चित्रपट करण्याचा विचार करत आहे का? यावर ते म्हणाले की, यावर चर्चा सुरू आहे. जेव्हा तुम्हाला एखाद्या चित्रपटात काम करताना चांगला वेळ मिळतो, तेव्हा तुम्ही त्यांच्याशी नवीन गोष्टींबद्दल बोलू लागता. मी रणवीरसोबत बराच वेळ घालवला आहे आणि आम्ही सर्व प्रकारच्या आयडियावर चर्चा केली आहे.

कोण आहे प्रमुख भुमिकेत

रणवीर सिंह चित्रपटात कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे. यासोबतच ताहिर राज भसीन, जीवा, साकिब सलीम, जतिन सरना, चिराग पाटिल, दिनकर शर्मा, निशांत दहिया, हार्डी संधू, साहिल खट्टर, अम्मी विर्क, आदिनाथ कोठारे, धैर्य करवा, आर बद्री आणि पंकज त्रिपाठी देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. दीपिका पादुकोण या चित्रपटात कपिल देव यांची पत्नी रोमीची व्यक्तिरेखा साकारणार आहे.

संबंधित बातम्या : 

अंकिता लोखंडेच्या वाढदिवसानिमित्त नवऱ्याने शेअर केली खास पोस्ट, वाचा काय आहे नेमके पोस्टमध्ये!

चित्रपटगृहांनंतर आता जॉन अब्राहमचा ‘सत्यमेव जयते 2’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर करणार धमाका…जाणून घ्या कधी आणि कुठे प्रदर्शित होणार!

'आदिती यांच्या बापाच्या पापांमुळे...,' शिवसेना आमदाराची खोचक टीका
'आदिती यांच्या बापाच्या पापांमुळे...,' शिवसेना आमदाराची खोचक टीका.
सच्चा शिवसैनिक कसा असतो ते एकनाथ शिंदे यांनी दाखवले - दीपक कसेरकर
सच्चा शिवसैनिक कसा असतो ते एकनाथ शिंदे यांनी दाखवले - दीपक कसेरकर.
पुढील निवडणूका बॅलेटपेपरवर घ्याव्यात, बाळासाहेब थोरात यांची मागणी
पुढील निवडणूका बॅलेटपेपरवर घ्याव्यात, बाळासाहेब थोरात यांची मागणी.
एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेने एनडीएला ताकद, काय म्हणाले बावनकुळे
एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेने एनडीएला ताकद, काय म्हणाले बावनकुळे.
केंद्रात जाणार का ? काय म्हणाले एकनाथ शिंदे
केंद्रात जाणार का ? काय म्हणाले एकनाथ शिंदे.
'मी काल मोदीजींना फोन केला आणि ...,'काय म्हणाले एकनाथ शिंदे
'मी काल मोदीजींना फोन केला आणि ...,'काय म्हणाले एकनाथ शिंदे.
एकनाथ शिंदे काय भूमिका मांडणार, काय म्हणाले ज्येष्ठ पत्रकार ?
एकनाथ शिंदे काय भूमिका मांडणार, काय म्हणाले ज्येष्ठ पत्रकार ?.
शिंदे यांनी देवेंद्र यांच्यासाठी रस्ता मोकळा करावा - भाजप नेता
शिंदे यांनी देवेंद्र यांच्यासाठी रस्ता मोकळा करावा - भाजप नेता.
'सरकारने आल्यानंतर लाडकी बहिण योजनेत....,' काय म्हणाले अंबादास दानवे
'सरकारने आल्यानंतर लाडकी बहिण योजनेत....,' काय म्हणाले अंबादास दानवे.
... हा मविआच्या नेत्यांचा डांबरटपणा आहे, काय म्हणाले बावणकुळे ?
... हा मविआच्या नेत्यांचा डांबरटपणा आहे, काय म्हणाले बावणकुळे ?.