Kajal Aggarwal: ‘सिंघम’ फेम काजल अगरवाल झाली आई; घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन

प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री आणि 'सिंघम' या चित्रपटातून बॉलिवूडमध्येही छाप सोडणारी काजल अगरवाल (Kajal Aggarwal) आई झाली आहे. काजलने मंगळवारी (19 एप्रिल) मुलाला जन्म दिला असून तिची बहीण निशा अगरवालने (Nisha Aggarwal) याबद्दलची माहिती दिली.

Kajal Aggarwal: 'सिंघम' फेम काजल अगरवाल झाली आई; घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन
kajal aggarwal, Gautam Kitchlu Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 20, 2022 | 9:09 AM

प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री आणि ‘सिंघम’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्येही छाप सोडणारी काजल अगरवाल (Kajal Aggarwal) आई झाली आहे. काजलने मंगळवारी (19 एप्रिल) मुलाला जन्म दिला असून तिची बहीण निशा अगरवालने (Nisha Aggarwal) याबद्दलची माहिती दिली. यावर्षी जानेवारी महिन्यात काजलने प्रेग्नंट असल्याचं सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना सांगितलं होतं. आता काजला आणि गौतम (Gautam Kitchlu) हे चिमुकल्या बाळाचे आई-बाबा झाले आहेत. काजल आणि तिचं बाळ सुखरुप असल्याचंही निशाने सांगितलं. सध्या काजल आणि गौतम यांच्यावर सोशल मीडियाद्वारे शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या दोघांनी 30 ऑक्टोबर 2020 रोजी मुंबईत लग्नगाठ बांधली.

काजल आणि गौतम हे लग्नापूर्वी सात वर्षांपासून एकमेकांचे चांगले मित्र होते. तीन वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी 2020 मध्ये लग्न केलं. मुंबईतील ताज महाल पॅलेस या पंचतारांकित हॉटेलमध्ये मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडला होता. गौतम हा ‘डिसर्न लिव्हिंग’ इंटेरिअर डिझायनिंग कंपनीचा संस्थापक आहे.

काजलची पोस्ट-

काही दिवसांपूर्वीच काजलने गौतमसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट लिहिली होती. गरोदरपणात त्याने काजलची कशाप्रकारे काळजी घेतली याबद्दल सांगत तिने त्याचे आभार मानले होते. ‘गेल्या 8 महिन्यात मी तुला सर्वांत प्रेमळ बाबा होताना पाहिलंय. मला माहित आहे की या बाळावर तुझं किती प्रेम आहे आणि तू आधीच किती काळजी घेत आहेस. मी खूप भाग्यवान आहे की आपल्या बाळाला असा पिता मिळाला आहे जो विनाशर्त प्रेम करतो आणि ज्याच्याकडे मी एक आदर्श व्यक्ती म्हणून पाहते. आपलं आयुष्य मोठ्या प्रमाणात बदलणार आहे आणि त्याबद्दल मी खूप कृतज्ञ आहे. आपल्याला आता निवांत एकत्र वेळ मिळणार नाही, दर वीकेंडला आपण चित्रपट पहायला जाऊ शकणार नाही किंवा निवांत शोज पाहू शकणार नाही, कदाचित आपण काही काळासाठी पार्ट्यांसाठी बाहेर जाऊ शकणार नाही किंवा डेट नाइट्स सेलिब्रेट करू शकणार नाही. पण आपल्याकडे एक अत्यंत गोंडस बाळ असेल जो आपल्या मनाला आनंदाने परिपूर्ण करेल’, अशा शब्दांत तिने भावना व्यक्त केल्या होत्या.

हेही वाचा:

Ranbir Alia Net Worth: साधेपणानं लग्न पण रणबीर-आलियाच्या संपत्तीचा आकडा ऐकून डोळे विस्फारतील!

Jayeshbhai Jordaar trailer: दमदार कथेला कॉमेडीचा तडका; रणवीरच्या ‘जयेशभाई जोरदार’चा ट्रेलर पाहिलात का?

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.