Kamaal R. Khan | KRK यांच्या छातीत दुखू लागल्याने रुग्णालयात केले दाखल, वादग्रस्त ट्विट भोवले
कमाल रशीद खान यांनी बॉलिवूड अभिनेते इरफान खान आणि ऋषी कपूर यांच्या निधनानंतर एक ट्विट केले होते. या ट्विटनंतर ते वादात सापडले. केआरकेने लिहिले होते की मी काही दिवसांपूर्वी सांगितले होते की जोपर्यंत तो काही प्रसिद्ध लोकांना सोबत घेत नाही तोपर्यंत कोरोना व्हायरस दूर होणार नाही.
मुंबई : चित्रपट समीक्षक आणि प्रसिध्द अभिनेते कमल आर. खान (Kamaal R. Khan) यांना 2020 चे वादग्रस्त ट्विट प्रकरण चांगलेच भोवल्याचे दिसते आहे. वादग्रस्त ट्विटमुळे (Controversial tweets) कमल आर. खान यांना तब्बल 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीयं. मात्र, यासंदर्भातील एक बातमी पुढे येत असून केआरके यांच्या छातीत दुखत असल्याचे सांगितले जातंय. छातीत दुखत असल्यामुळे त्यांना मुंबईतील (Mumbai) शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. कमाल रशीद खान यांना मुंबई विमानतळावरून अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले.
इरफान खान आणि ऋषी कपूर यांच्याविरोधात शेअर केले होते ट्विट
कमाल रशीद खान यांनी बॉलिवूड अभिनेते इरफान खान आणि ऋषी कपूर यांच्या निधनानंतर एक ट्विट केले होते. या ट्विटनंतर ते वादात सापडले. केआरकेने लिहिले होते की मी काही दिवसांपूर्वी सांगितले होते की जोपर्यंत तो काही प्रसिद्ध लोकांना सोबत घेत नाही तोपर्यंत कोरोना व्हायरस दूर होणार नाही. मग लोक मला शिव्या देतील म्हणून मी नावं लिहिली नाहीत…अशाप्रकारचे वादग्रस्त ट्विट केआरकेने शेअर केले होते.
छातीत दुखत असल्याने मुंबईतील रूग्णालयात केले दाखल
केआरकेच्या या ट्विटनंतर मोठा वाद निर्माण झाला. 2020 मध्ये युवा सेनेच्या कोअर कमिटीने मालाड पोलिस स्टेशनमध्ये केआरकेच्या विरोधात गुन्हा दाखल केला. दिवंगत अभिनेते इरफान खान आणि ऋषी कपूर यांच्याबद्दल कमाल रशीद खान यांनी आक्षेपार्ह ट्विट केल्याचा आरोप युवा सेनेच्या कोअर कमिटीचे सदस्य राहुल कनाल यांनी केला होता. याप्रकरणी मालाड पोलिसांनी केआरकेविरुद्ध कलम 294 अन्वये गुन्हा दाखल केला होता. याच प्रकरणी आता केआरकेला अटक करण्यात आलीयं.