Bollywood Movies | केआरकेच्या पुन्हा एकदा निशाण्यावर बाॅलिवूडचे चित्रपट, ट्विट करत केली जहरी टिका!

कमाल रशीद खानच्या मनात बॉलिवूड चित्रपटांविषयी द्वेष आहे. केआरके प्रत्येक नवीन बॉलिवूड चित्रपट पाहतो आणि ट्विटरवर त्याच्यावर टीका देखील करतो. काही दिवसांपूर्वीच केआरकेने शमशेरा या रणबीर कपूरच्या चित्रपटावर निशाना साधला होता.

Bollywood Movies | केआरकेच्या पुन्हा एकदा निशाण्यावर बाॅलिवूडचे चित्रपट, ट्विट करत केली जहरी टिका!
Follow us
| Updated on: Jul 30, 2022 | 12:01 PM

मुंबई : कमाल रशीद खान उर्फ ​​केआरकेने बाॅलिवूड (Bollywood) चित्रपटांना पुन्हा एकदा टार्गेट करण्यास सुरूवात केलीयं. केआरके स्वतः चित्रपट समीक्षक म्हणून ओळखले जातात. विशेषतः त्यांना बॉलिवूड चित्रपट आवडत नाहीत. दिग्दर्शक (Director) मोहित सूरीचा चित्रपट ‘एक व्हिलन रिटर्न्स’ पाहिल्यानंतर केआरकेने रिव्ह्यू दिला आहे. पहिल्याच दिवशी हा चित्रपट मोठा फ्लॉप (Flop) असल्याचे त्याने सांगितले आहे. केआरकेने आणखी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, रणबीर कपूरचा ‘ब्रह्मास्त्र’ लवकरच ‘लाशें बिछाने आ जाएगी’ असे म्हटले आहे. यामुळे आता हा वाद वाढण्याची चिन्हे आहेत. यापूर्वी शमशेरावर केआरके टिका केली होती.

इथे पाहा केआरके केलेले ट्विट

केआरकेने ट्विट करत पुन्हा केली जहरी टिका

केआरकेने एक ट्विट केले आहे, ज्याची चर्चा आता सर्वत्र रंगताना दिसते आहे. ट्विट केआरकेने सतत फ्लॉप होणाऱ्या चित्रपटांची नावे घेत बॉलीवूडची खिल्ली उडवली आहे. कंगना राणौतचा ‘धाकड’, अक्षय कुमारचा ‘पृथ्वीराज’, रणबीर कपूरचा ‘शमशेरा’ आणि आमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटांचा उल्लेख करत त्याने टोमणे मारले आहेत. केआरकेने ट्विटमध्ये म्हटले आहे की, यावेळी बॉलिवूड धमाल करत आहे. यामध्ये त्याने पृथ्वीराज, धाकड, लाल सिंग चड्ढा, शमशेरा चित्रपटांचा देखील उल्लेख केला आहे.

केआरकेच्या ट्विटवर युजर्सच्या असंख्य प्रतिक्रिया

केआरकेच्या ट्विटवर अनेक युजर्सने आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने कमेंट करत म्हटले आहे की, तुम्ही त्यात रक्षाबंधनाचे नाव लिहायला विसरलात, तीही धूळ चाटणार आहे. आणखी एका युजरने लिहिले की, ‘प्रेत ठेवायला येणार. आमिर बाबाला निकाल आधीच समजला आहे, त्यामुळे रिलीजपूर्वी 160 कोटींमध्ये OTT पेस्ट करण्यात आला. आमिर खानचे अनेक चाहते त्याच्या ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटाला पसंती देत ​​आहेत. काही युजर्सचे म्हणणे आहे की केआरकेची यादी बरोबर आहे पण आमिरचा चित्रपट ब्लॉकबस्टर हिट ठरेल.

केआरके आणि बाॅलिवूडमधील वाद वाढण्याची शक्यता

कमाल रशीद खानच्या मनात बॉलिवूड चित्रपटांविषयी द्वेष आहे. केआरके प्रत्येक नवीन बॉलिवूड चित्रपट पाहतो आणि ट्विटरवर त्याच्यावर टीका देखील करतो. काही दिवसांपूर्वीच केआरकेने शमशेरा या रणबीर कपूरच्या चित्रपटावर निशाना साधला होता. त्याने एक ट्विट करत म्हटले होते की, बाॅलिवूडची चित्रपटे ही कोरोनापेक्षाही अधिक खतरनाक आहेत. तसेच त्यांने चित्रपटाच्या दिग्दर्शकांवरही जहरी टिका केली होती आणि म्हटले होते की, यांचे चित्रपट चांगले नाहीत हे कधीच बाॅलिवूडवाले मान्य करत नाहीत.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.