कमाल आर खान याने दिला ‘वरुण धवन’च्या भेडिया चित्रपटाला रिव्ह्यू, चोरीसह केले हे आरोप
सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत भेडिया चित्रपटाचा रिव्ह्यू कमाल आर खानने चाहत्यांसोबत शेअर केलाय.
मुंबई : बॉलिवूड अभिनेता वरुण धवनच्या भेडिया या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत. हा चित्रपट 25 नोव्हेंबरला चाहत्यांच्या भेटीला येतोय. वरुण धवन आणि चित्रपटाची पूर्ण टीम प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. जयपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमामध्ये वरूणने या चित्रपटातील गाण्यावर धमाकेदार डान्स केला होता. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल देखील झाला होता. दोन दिवसांनी चित्रपट रिलीज होणार आहे, त्यापूर्वीच आता कमाल आर खानने चित्रपटाला रिव्ह्यू दिला आहे.
सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत भेडिया चित्रपटाचा रिव्ह्यू कमाल आर खानने चाहत्यांसोबत शेअर केलाय. यासोबतच त्याने एक फोटोही शेअर केला आहे. आता केआरकेची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. केआरेकच्या रिव्ह्यूमुळे चित्रपटाच्या बाॅक्स आॅफिस कलेक्शनवर काय परिणाम होतो, हे दोन दिवसांमध्ये कळेल.
Film #Bhediya concept is looted from Rahul Roy’s film #Junoon and this foreign film. pic.twitter.com/hltnjQRc3v
— KRK (@kamaalrkhan) November 23, 2022
केआरकेने थेट जुनून चित्रपटाची भेडिया हा चित्रपट कॉपी असल्याचे म्हटले आहे. जुनून हा चित्रपट 1999 मध्ये रिलीज झाला होता. इतकेच नाही तर हाॅलिवूड चित्रपटाची थेट काॅपी असल्याचे केआरकेने आपल्या रिव्ह्यूमध्ये म्हटले आहे. आता चाहत्यांना हाच प्रश्न पडला आहे की, खरोखरच भेडिया हा चित्रपट जुनूनची काॅपी आहे का?
इतकेच नाही तर भेडिया हा चित्रपट हॉलिवूड चित्रपटाचा काॅपी असल्यासोबतच हाॅलिवूड चित्रपटाचे पोस्ट चोरल्याचाही आरोप केआरकेने भेडिया चित्रपटावर केला आहे. भेडियाच्या पोस्टसोबतच केआरकेने मॉर्बियस या हाॅलिवूड चित्रपटाचे देखील पोस्टर शेअर केले आहे, विशेष बाब म्हणजे दोन्ही चित्रपटांचे पोस्टर एकसारखेच दिसत आहेत.
भेडिया या चित्रपटात वरुण धवन महत्वाच्या भूमिकेत आहे. चित्रपटाची स्टोरी ही अरूणाचल प्रदेशमधील असून वरुण धवनचे नाव चित्रपटामध्ये भास्कर असे आहे. एक दिवस रात्री भास्कर जंगलामध्ये गेला असता त्यावेळी त्याला भेडिया चावतो. त्यानंतर भास्करच्या अंगात भेडिया शिरतो आणि तो भेडियासारखा वागू लागतो, असे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे.