मुंबई : अभिनेता आणि चित्रपट समिक्षक कमाल आर खान नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडतो. आता तर हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूकीच्या संदर्भात सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत केआरके याने चक्क बाॅलिवूड अभिनेत्री कंगना राणावत हिला टार्गेट केले आहे. कंगना देखील आता केआरकेला जोरदार प्रतिउत्तर देणार हे नक्कीच आहे. यामुळे आता हा वाद वाढण्याची दाट शक्यता आहे. हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूकीमध्ये भाजपाच्या जास्त जागा आल्या नसून काॅंग्रेसला तेथे बहुमत मिळाले आहे. यावरून आता केआरकेने कंगनावर निशाना साधला आहे.
कंगना राणावत भाजपाला सपोर्ट करताना दिसते. अनेकदा याच्या अनेक पोस्टही कंगना सोशल मीडियावर व्हायरल करते. याच मुद्दाला पकडून केआरकेने कंगनाला टार्गेट करणारी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केलीये.
केआरकेने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, खरोखरच ही खूप जास्त अफसोस गोष्टी आहे कंगना राणावतच्या राज्यामध्ये बीजेपी हारली आहे. मॅडम हा तर खूप मोठा अपमानच झालाय…कंगना ही हिमाचल प्रदेशची आहे.
Ye Bade afsos Ki Baat Hai, Ki #KanganaRanaut madam Ke state #HimachalPradeshElection2022 main Madam Ki Party BJP Haar Gayee. Ye Toh Bhari insult Ho Gayee Madam Ji.?
— KRK (@kamaalrkhan) December 8, 2022
आता केआरकेची हीच पोस्ट सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. यावर युजर्स देखील मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत. आता यावर कंगना काय रिप्लाय देते हे पाहण्यासारखे ठरणार आहे.
केआरकेच्या निशाण्यावर कायमच बाॅलिवूडचे कलाकार आहे चित्रपट असतात. काही दिवसांपूर्वी शाहरुख खान याच्या चित्रपटाला सपोर्ट करणार असल्याचे केआरके याने सांगितले होते.
पठाण चित्रपटाला सपोर्ट करणार असल्याचे सांगून लगेचच त्याने पठाण चित्रपटाविरोधात सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत पूर्ण चित्रपट काॅपी केल्याचे लिहिले होते.