Video : कंगना राणावत आणि ‘जया बच्चन’चा तो व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल
उंचाईच्या स्पेशल स्क्रिनिंगवेळी जया बच्चन स्टेजवर येतात. त्यावेळी अनुपम खेरसोबत अनेक कलाकार स्टेजवर होते.
मुंबई : मुंबईत ‘उंचाई’ स्पेशल स्क्रीनिंगचे आयोजन करण्यात आले होते. या स्पेशल स्क्रीनिंगसाठी अनेक बाॅलिवूड स्टारर्सने हजेरी लावली. अनुपम खेर सर्व पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी पुढे होते. या स्पेशल स्क्रीनिंगसाठी अमिताभ बच्चन यांच्या पत्नी जया बच्चन देखील पोहचल्या होत्या. जया बच्चन स्टेजवर गेल्यानंतर असे काही घडले की, त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. नेहमीप्रमाणे यामुळे जया बच्चन चर्चेचा विषय ठरल्या आहेत.
View this post on Instagram
उंचाईच्या स्पेशल स्क्रिनिंगवेळी जया बच्चन स्टेजवर येतात. त्यावेळी अनुपम खेरसोबत अनेक कलाकार स्टेजवर होते. या दरम्यान जया बच्चन यांना पाहून अभिनेत्री कंगना राणावत जया बच्चन यांना बोलण्यासाठी पुढे येत काही बोलते, मात्र. जया बच्चन कंगनाकडे पाहून दुर्लक्ष करतात आणि पुढे निघून जातात. सध्या हाच व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय.
View this post on Instagram
कंगना आणि जया बच्चनचा हा व्हिडीओ पाहून युजर्स प्रतिक्रिया देत आहेत. तर याच कार्यक्रमातील दुसरा व्हिडीओ व्हायरल होतोय. यामध्ये जया बच्चनचा मुलगा अर्थात अभिषेक बच्चन कंगनाला मिठी मारून मस्त गप्पा मारताना दिसत आहे. मात्र, कंगनाकडे पाहून जया बच्चन यांनी का दुर्लक्ष केले हा प्रश्न उपस्थित केला जातोय. जया बच्चन कायमच त्यांच्या बिनधास्त वक्तव्यामुळे चर्चेत असतात.