‘जुग जुग जियो, गंगुबाई काठियावाडीसुद्धा फ्लॉप झाले, त्यांच्याबद्दल का बोलत नाही?’, ‘धाकड’वरून Kangana Ranaut चा सवाल

बॉक्स ऑफिसवर इतरही चित्रपट फ्लॉप झाले आहेत. मात्र त्यांच्याबद्दल का बोललं जात नाही, असा सवात तिने केला आहे. धाकड फ्लॉप झाल्याने चित्रपटाच्या निर्मात्यांना त्यांचं ऑफिस विकावं लागल्याची चर्चा होती. या चर्चांवरही कंगना व्यक्त झाली.

'जुग जुग जियो, गंगुबाई काठियावाडीसुद्धा फ्लॉप झाले, त्यांच्याबद्दल का बोलत नाही?', 'धाकड'वरून Kangana Ranaut चा सवाल
Dhaakad Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Jul 08, 2022 | 1:53 PM

अभिनेत्री कंगना रनौतचा (Kangana Ranaut) ‘धाकड’ (Dhaakad) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपेक्षित कमाई करण्यात अपयशी ठरला. मात्र यामागे माध्यमांनी चित्रपटाविरोधात केलेली नकारात्मक मोहीम (negative PR) कारणीभूत ठरल्याचा आरोप कंगनाने केला आहे. बॉक्स ऑफिसवर इतरही चित्रपट फ्लॉप झाले आहेत. मात्र त्यांच्याबद्दल का बोललं जात नाही, असा सवात तिने केला आहे. धाकड फ्लॉप झाल्याने चित्रपटाच्या निर्मात्यांना त्यांचं ऑफिस विकावं लागल्याची चर्चा होती. या चर्चांवरही कंगना व्यक्त झाली. इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये कंगनाने धाकडबद्दल बऱ्याच पोस्ट लिहिल्या आहेत. त्याचप्रमाणे जाणूनबुजून तिच्या चित्रपटाबद्दल नकारात्मक बोललं गेलंय, अशी तक्रार तिने केली आहे.

धाकडचे निर्माते दीपक मुकुट यांची मुलाखत शेअर करत कंगनाने लिहिलं, ‘माझ्या निर्मात्यांनी त्यांचं ऑफिस विकलेलं नाही. त्यांनी हेसुद्धा स्पष्ट केलंय की त्यांचा चित्रपटावरील खर्च पूर्णपणे भरून निघाला आहे. तरीसुद्धा नकारात्मक पीआर थांबत का नाहीत? जर तुम्हाला टीकाच करायची आहे तर समोर येऊन बोलण्याची हिंमत तरी ठेवा. चिल्लर माफिया!’ कंगनाने इतर वेबसाइट्सच्याही काही बातम्या शेअर करत पुढे म्हटलं, ‘राधेश्याम, गंगुबाई काठियावाडी, जुग जुग जियो, 83 हे चित्रपटसुद्धा फ्लॉप झाले आहेत पण कोणीच त्याबद्दल बोलत नाही. यामागे काही खास कारण आहे का?’

हे सुद्धा वाचा

इन्स्टा पोस्ट-

धाकड हा कंगनाचा ॲक्शन फिल्म अशून रजनीश घई यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटाने फक्त चार कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. तर 85 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये हा चित्रपट बनला आहे. यामध्ये कंगनासोबत अर्जुन रामपाल आणि दिव्या दत्ता यांच्याही भूमिका आहेत. तर दुसरीकडे जुग जुग जियो या चित्रपटाने दोन आठवड्यांत 70 कोटींची कमाई केली आहे. आलियाच्या गंगुबाई काठियावाडीने 120 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.

“आम्ही खूप मेहनत घेऊन धाकड हा चित्रपट बनवला आहे आणि तो चांगला चित्रपट आहे. मला समजत नाही की कुठे काय चुकलं? पण लोकांच्या मताचा मी आदर करतो. आमच्या मते आम्ही खूप चांगला स्पाय-थ्रिलर-ॲक्शन चित्रपट बनवला आहे. ओटीटीकडूनही आम्हाला ऑफर्स मिळाले आहेत. झी5 ने आमच्या चित्रपटाचे हक्क विकत घेतले आहेत. ओटीटी प्लॅटफॉर्मकडून ऑफर्स येत नसल्याच्या चर्चा खोट्या आहेत”, असं निर्मात्यांनी एका मुलाखतीत स्पष्ट केलं.

आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.