लता मंगेशकर यांच्याशी कंगना राणावत हिने केली तुलना, म्हणाली कधीच पैसे
या चित्रपटामध्ये कंगनासोबत अनुपम खेर, मिलिंद सोमन अशी तगडी टीम आहे. कंगना याच चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.
मुंबई : कंगना राणावत कायमच तिच्या विधानांमुळे चर्चेत असते. विषय कोणताही असो कंगना आपले मत मांडल्याशिवाय राहात नाही. अनेकदा कंगना तिच्या विधानांमुळे वादाच्या भोवऱ्यामध्ये देखील अडकते. आता कंगना तिच्या आगामी इमरजेंसी या चित्रपटामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटामुळे वाद निर्माण झाला होता. या चित्रपटामध्ये कंगना ही इंदिरा गांधींची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटामध्ये कंगनासोबत अनुपम खेर, मिलिंद सोमन अशी तगडी टीम आहे. कंगना याच चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.
कंगना चित्रपटाच्या सेटवरून अनेक व्हिडीओ आणि फोटो हे आपल्या चाहत्यांसाठी कायमच शेअर करते. कंगनाच्या निशाण्यावर अनेकदा बाॅलिवूडचे चित्रपट असतात. कुठल्याही गोष्टीचा विचार न करता कंगना अनेकदा बाॅलिवूडवर टीका देखील करते.
नुकताच कंगना राणावत हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीये. या पोस्टमध्ये कंगना हिने थेट स्वत:ची तुलना लता मंगेशकर यांच्यासोबत केलीये. कंगनाची ही पोस्ट आता सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे.
कंगनाने पोस्टमध्ये म्हटले आहे की, मी कितीतरी वेळा पैसे आॅफर केलेले असताना देखील लग्नामध्ये डान्स करण्यास नकार दिला आहे. मी कधीच पैशांसाठी कोणत्या खासगी पार्टी किंवा लग्नामध्ये डान्स केला नाहीये.
कंगना राणावत हिने आशा भोसले यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये आशा भोसले सांगताना दिसत आहेत की, लता मंगेशकर यांनी कधीच पैशांसाठी कोणत्या खासगी पार्टीमध्ये किंवा लग्नामध्ये गाणे म्हटले नाही.
एका लग्नामध्ये गाणे म्हणण्यासाठी लता मंगेशकर यांना एक मिलियन डॉलरची आॅफर आली होती. परंतू यासाठी त्यांनी नकार दिल्याचे देखील आशा भोसले यांनी सांगितले आहे.
कंगनाने पोस्ट शेअर करत म्हटले की, हा व्हिडिओ पाहून आनंद झाला… लताजी खरोखरच प्रेरणादायी आहेत…आता कंगना राणावतची हिच पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.