Kangana Ranaut Controversy | कंगना रनौतच्या अडचणीत वाढ, ‘भीकेचं स्वातंत्र्य’ वक्तव्याप्रकरणी कंगनावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल!

1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य नाही भीक मिळाली असल्याचे वक्तव्य केल्याबद्दल अभिनेत्री कंगना रनौतवर (Kangana Ranaut) यूपीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वकील विकास तिवारी यांनी उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातील ACJM III च्या कोर्टात कंगना रनौत विरुद्ध देशद्रोहाचा खटला दाखल केला आहे.

Kangana Ranaut Controversy | कंगना रनौतच्या अडचणीत वाढ, ‘भीकेचं स्वातंत्र्य’ वक्तव्याप्रकरणी कंगनावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल!
Kangana Ranaut
Follow us
| Updated on: Nov 23, 2021 | 10:33 AM

मुंबई : 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य नाही भीक मिळाली असल्याचे वक्तव्य केल्याबद्दल अभिनेत्री कंगना रनौतवर (Kangana Ranaut) यूपीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वकील विकास तिवारी यांनी उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातील ACJM III च्या कोर्टात कंगना रनौत विरुद्ध देशद्रोहाचा खटला दाखल केला आहे. न्यायालयाने या प्रकरणाच्या सुनावणीसाठी 29 नोव्हेंबरची तारीख निश्चित केली आहे.

अवधेश तिवारी आणि अवनीश चतुर्वेदी या वकिलांच्या माध्यमातून विकास तिवारीने कंगना रनौतविरोधात कोर्टात केस दाखल केली आहे. त्यांनी कंगनावर आरोप केला की, 11 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 9:00 वाजता तक्रारकर्त्याने विविध वर्तमानपत्रे, चॅनेल आणि सोशल मीडियावर पाहिले आणि ऐकले की, कंगनाने 1947च्या स्वातंत्र्याला भीक मागणे म्हटले आहे. भारताला खरे स्वातंत्र्य 2014 मध्ये मिळाले, असेही कंगनाने सांगितले. असे वक्तव्य करून कंगनाने स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्यांचा अपमान केल्याचा आरोप वकिलाने केला आहे.

कंगनाने समाजात खळबळ उडवून दिली आहे. देशाच्या एकात्मतेवर आणि अखंडतेवर विपरीत परिणाम होऊन देश गृहयुद्धाकडे जाईल, असे वक्तव्य त्यांनी केले आहे. याशिवाय 16 नोव्हेंबर 2021 रोजी त्यांनी महात्मा गांधींना अपशब्द बोलून देशात अराजकतेचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. कंगनाच्या या वक्तव्यामुळे तक्रारदार आणि साक्षीदारांच्या भावना दुखावल्या. आरोपींना समन्स बजावून शिक्षा द्यावी, अशी मागणी करण्यात आली.

शीख संघटनेकडून कंगनाच्या विरोधात मुंबईत तक्रार दाखल

एका शीख संघटनेने सोमवारी मुंबईत तक्रार दाखल करून बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतविरुद्ध एफआयआर नोंदवण्याची मागणी केली. कंगनाने तिच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये शीख समुदायाविरोधात अपमानास्पद भाषा वापरली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. खार पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीकडून (डीएसजीएमसी) तक्रार प्राप्त झाली असून, ते त्याचा तपास करत आहेत. ते म्हणाले की, शिरोमणी अकाली दल (एसएडी) नेते आणि डीएसजीएमसीचे अध्यक्ष मनजिंदर सिंग सिरसा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने कंगनान रनौत यांच्याविरोधात तक्रार दाखल केली.

कंगनाकडून शीख समुदायावर खलिस्तानी दहशतवादी असल्याचा आरोप

त्यात, डीएसजीएमसीने नमूद केले की, कंगनाने जाणूनबुजून शेतकऱ्यांचा निषेध (किसान मोर्चा) खलिस्तानी आंदोलन म्हणून चित्रित केला आणि शीख समुदायाला खलिस्तानी दहशतवादी म्हणूनही संबोधले. 1984 आणि त्यापूर्वीच्या नरसंहाराचे वर्णन तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याकडून सुनियोजित चाल असल्याचे त्यांनी सांगितले. कंगना रनौत यांनी शीख समुदायाविरुद्ध अतिशय अपमानास्पद भाषा वापरल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे. त्यांनी केलेले हे विधान अत्यंत निंदनीय आहे, ज्यामुळे जगभरातील शीख समुदायाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, असेही त्यात म्हटले आहे.

हेही वाचा :

Happy Birthday Amruta Khanvilkar | ‘वाजले की बारा..’ म्हणत गाजवलं मराठी विश्वं तर, हिंदीतही अमृता खानविलकरला पाहण्यास प्रेक्षक ‘राझी’!

Special Story | केवळ ‘Two Indias’ नाही तर, वीर दास आणि वादांचं जुनं कनेक्शन, काहीना काही कारणांमुळे सतत राहिलाय चर्चेत!

श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.