Defamation Case : कंगना पुन्हा अनुपस्थित, न्यायाधीश म्हणाले ‘पुढच्या सुनावणीस गैरहजर राहिल्यास अटकेचे वॉरंट निघणार!’

लेखक-दिग्दर्शक जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी कंगना रनौतविरोधात (Kangana Ranaut) बदनामीचा खटला दाखल केला होता, ज्यावर आज (14 सप्टेंबर) अंधेरी न्यायालयात सुनावणी होणार होती. जावेद अख्तर पत्नी शबाना आजमीसह कोर्टात पोहोचले होते. पण, कंगना रनौत आज देखील कोर्टात पोहोचली नाही.

Defamation Case : कंगना पुन्हा अनुपस्थित, न्यायाधीश म्हणाले ‘पुढच्या सुनावणीस गैरहजर राहिल्यास अटकेचे वॉरंट निघणार!’
Kangana-Javed
Follow us
| Updated on: Sep 14, 2021 | 2:16 PM

मुंबई : लेखक-दिग्दर्शक जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी कंगना रनौतविरोधात (Kangana Ranaut) बदनामीचा खटला दाखल केला होता, ज्यावर आज (14 सप्टेंबर) अंधेरी न्यायालयात सुनावणी होणार होती. जावेद अख्तर पत्नी शबाना आजमीसह कोर्टात पोहोचले होते. पण, कंगना रनौत आज देखील कोर्टात पोहोचली नाही. कंगनाच्या वकिलाचे म्हणणे आहे की, अभिनेत्रीची तब्येत खराब आहे, म्हणूनच ती न्यायालयात हजर राहू शकली नाही.

आता या प्रकरणी सुनावणी 20 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. पण, न्यायाधीशांनी म्हटले आहे की, जर कंगना पुढील सुनावणीत न्यायालयात हजर झाली नाही, तर तिच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले जाईल.

न्यायालयात काय घडले?

कंगनाचे वकील रिझवान सिद्दीकी यांनी न्यायालयात सांगितले की, कंगना आजारी आहे. त्यामुळे ती न्यायालयात येऊ शकत नाही. तिच्यामध्ये कोरोनाची लक्षणे आढळली आहेत, म्हणून त्यांना आजच्या सुनावणीपासून सूट दिली पाहिजे. त्यांनी असेही सांगितले की, कंगनाला कोरोना चाचणी करावी लागेल, कारण गेल्या काही दिवसांपासून ती तिच्या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान अनेक लोकांना भेटली आहे. कंगनाच्या वकिलाने कोर्टात वैद्यकीय प्रमाणपत्रही सादर केले आहे आणि एक आठवड्याचा वेळही मागितला आहे.

काय म्हणाले जावेद यांचे वकील?

जावेद अख्तरचे वकील म्हणतात की, अनेक नोटिसा देऊनही कंगना कोर्टात येत नाही. त्याचबरोबर तक्रारदार जावेद अख्तर सतत न्यायालयात येत आहेत. तसेच न्यायव्यवस्थेचा सन्मान केला जात नाही. या प्रकरणाला जाणीवपूर्वक विलंब करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे, ते म्हणाले.

न्यायाधीशांनी आता 20 सप्टेंबरपर्यंत सुनावणी पुढे ढकलली आहे. त्यावेळी जर कंगना आली नाही, तर तिच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केले जाईल. आता कंगनाला पुढील सुनावणीला हजर राहावे लागेल आणि जर ती कोर्टात आली नाही, तर तिच्या अडचणी वाढू शकतात.

गुन्हा का नोंदवला गेला?

गेल्या वर्षी सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर अभिनेत्रीने काही मुलाखतींमध्ये जावेद अख्तर यांच्या विरोधात अनेक वक्तव्ये केली. तेव्हा जावेद अख्तर यांनी कंगनाविरोधात हा खटला दाखल केला होता. यानंतर जावेद यांनी कंगनाच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल केला. त्यांनी अभिनेत्रीवर आपली प्रतिमा खराब करण्याचा आरोप केला. तेव्हापासून आजपर्यंत दोघांमधील हे प्रकरण चालू आहे.

बदनामीची कारवाई रद्द करण्याची विनंती

काही दिवसांपूर्वी कंगना रनौतने तिच्यावरील बदनामीची कारवाई रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. मात्र, न्यायालयाने अभिनेत्रीची याचिका फेटाळली.

हेही वाचा :

लिहिणाऱ्या हातांना सलाम! गणपती उत्सवात प्रवाह परिवारातील 25 लेखकांचा गणरायाची मूर्ती देऊन सन्मान

Sukh Mhnje Nakki Kay Asta : ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत गौराईंचं आगमन, पाहा खास फोटो

‘आमच्या गुटखा किंगसमोर फिका पडतोय हा मार्वल हिरो’, शांग-चीला पाहून प्रेक्षकांना आली अजय देवगणची आठवण!

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.