मुंबई : अभिनेत्री कंगना रनौतचा (Kangana Ranaut) एक नवा शो येऊ घातलाय. ज्याचं नाव आहे, ‘लॉक अप’(Lock Up). या शोचं कंगना रनौत अँकरिंग करणार आहे. एकता कपूरचा (Ekta Kapoor) हा नवा कार्यक्रम Alt Balaji आणि MX Player वर प्रसारित होणार आहे. या कार्यक्रमात अभिनेता वीर दास सहभागी होणार असल्याची सध्या चर्चा होतेय. यावर वीर दास ट्विट करत याचं खंडण केलं आहे. याबाबत बातम्याही प्रसारित झाल्या, त्यावरही वीर दासने नाराजी व्यक्त केली आहे. प्रत्यक्षात कंगना आणि वीर दास हे पूर्णपणे भिन्न विचारांचे आहेत. अश्यात हे दोघे एकाच कार्यक्रमात दिसणार असल्याची चर्चा झाली. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. अनेकांनी यावर आश्चर्य व्यक्त केलं.
वीरदासचं ट्विट
कंगनाच्या ‘लॉक अप’ या कार्यक्रमात वीर दास सहभागी होणार असल्याचं बोललं जातंय. यावर वीर दासने स्पष्टीकरण दिलं आहे. त्याने आपल्या ट्विटमध्ये लिहिलंय की, “ज्यांनी मी या कार्यक्रमात सहभागी होणार असं कोण बोललं मला माहीत नाही. बरेच लोक माझ्याबद्दल लिहित आहेत. पण त्यांनी माझ्याशी संपर्क न करता हे लिहिलं आहे. मला त्यात रसही नाही. ‘लॉक अप’साठी कंगना आणि तिच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा!”
Hey all. Not sure who this journalist is. Or if journalism still exists. But just to clarify because there’s a lot of people writing to me. Have never been approached, and am not doing or interested in this. Wish Kangana and her cast all the very best being locked up.
Cheers. pic.twitter.com/U63a1USyQ5— Vir Das (@thevirdas) February 8, 2022
बऱ्याच दिवसांपासून वीर दास कंगनाच्या शोमध्ये सहभागी होणार असल्याचं बोललं जातंय. काहींनी यावर आश्चर्य व्यक्त केलं. कारण या दोन कलाकारांमध्ये खूप वाद आहेत. दोघेही पूर्णपणे भिन्न विचारसरणीचे आहेत. पण वीर दासने त्याच्या Twitter वर एक पोस्ट शेअर करत हे वृत्त फेटाळून लावलं आहे.या सगळ्या अफवा असल्याचं त्याने म्हटलंय.
कंगना पहिल्यांदाच करणार कार्यक्रम होस्ट
कंगना पहिल्यांदाच एक रिअॅलिटी शो होस्ट करताना दिसणार आहे. पण या व्यतिरिक्त कंगनाने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तसंच सध्याही तिच्या काही चित्रपटांचं चित्रिकरण सुरू आहे. चुकतंच तिचा ‘थलायवी’ आला होता. ‘धाकड’ आणि ‘तेजस’या सिनेमांमधून ती लवकरच मोठ्या पडद्यावर तिच्या चाहत्यांना पुहायला मिळणार आहे. या चित्रपटांचं शूटिंग जवळपास पूर्ण झालं आहे. याशिवाय कंगना तिच्या वादग्रस्त विधानांसाठीही प्रसिद्ध आहे.
संबंधित बातम्या