Kangana Ranaut | अखेर कंगनाच्या पासपोर्टचे नुतनीकरण झाले! लवकर ‘धाकड’च्या चित्रीकरणासाठी परदेशी रवाना होणार

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) हिच्या पासपोर्टचे नूतनीकरण करण्यात आले आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन तिने याबाबत माहिती दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून कंगनाला पासपोर्टच्या नूतनीकरणाची चिंता होती, पण आता तिची समस्या दूर झाली आहे.

Kangana Ranaut | अखेर कंगनाच्या पासपोर्टचे नुतनीकरण झाले! लवकर ‘धाकड’च्या चित्रीकरणासाठी परदेशी रवाना होणार
कंगना रनौत
Follow us
| Updated on: Jun 29, 2021 | 6:48 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) हिच्या पासपोर्टचे नूतनीकरण करण्यात आले आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन तिने याबाबत माहिती दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून कंगनाला पासपोर्टच्या नूतनीकरणाची चिंता होती, पण आता तिची समस्या दूर झाली आहे. तिने ही पोस्ट शेअर करून सांगितले आहे की, आता ती लवकरच धकडच्या शूटिंगसाठी परदेशात जाणार आहे (Kangana Ranaut passport renewal to be expedited after necessary corrections).

‘धाकड’च्या दिग्दर्शकासमवेत एक फोटो शेअर करुन कंगनाने चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. फोटो शेअर करताना तिने लिहिले की, ‘मला माझा पासपोर्ट मिळाला आहे. आपली काळजी आणि शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद. मुख्य म्हणजे मी लवकरच तुझ्याबरोबर असणार आहे.’ कंगनाला पासपोर्ट मिळाल्यानंतर तिचे चाहते खूप खुश झाले आहेत. त्याने कंगनाच्या या पोस्टवर कमेंट करून चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

पाहा कंगना रनौतची पोस्ट

कंगनाच्या या पोस्टवर एका फॅनने कमेंट केली की, ‘ऑल द बेस्ट क्वीन कंगना.’ तर दुसर्‍या फॅनने लिहिले की, ‘अभिनंदन’. तिच्या हजारो चाहत्यांना कंगनाची ही पोस्ट आवडली आहे.

कोर्टाने हे प्रकरण पासपोर्ट प्राधिकरणाकडे सोपवले!

सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात कंगना रनौतच्या पासपोर्ट नूतनीकरणाच्या सुनावणीत कोर्टाने पासपोर्ट प्राधिकरणाच्या बाजूने निकाल दिला होता. त्यांनी म्हटले होते की, कंगनाच्या पासपोर्टचे नूतनीकरण करण्याची जबाबदारी पासपोर्ट प्राधिकरणाची आहे.

शूटिंगसाठी परदेशी रवाना!

आगामी ‘धाकड’ या चित्रपटाच्या शूटिंगसाठी कंगनाला बुडापेस्टला जावे लागणार होते. ज्यासाठी तिला पासपोर्टचे नूतनीकरण करणे आवश्यक होते. त्यानंतर कंगनाने मुंबई उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. परंतु, कोर्टानेही या प्रकरणाचा निर्णय पासपोर्ट प्राधिकरणावर सोडला होता.

‘थलायवी’ची प्रतीक्षा!

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे तर, कंगना रनौत लवकरच ‘थलायवी’मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात ती तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 23 एप्रिल रोजी रिलीज होणार होता, पण कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे तो पुढे ढकलण्यात आला. चित्रपटाची दुसरी रिलीज डेट अद्याप जाहीर झालेली नाही. याशिवाय कंगनाने तिच्या आगामी ‘इमर्जन्सी’ या चित्रपटाची तयारीही सुरू केली आहे. या चित्रपटात ती इंदिरा गांधीच्या भूमिकेत दिसणार आहे.

(Kangana Ranaut passport renewal to be expedited after necessary corrections)

हेही वाचा :

Devmanus | ‘देवमाणसा’चा पर्दाफाश होणार? एसीपी दिव्या सिंहसह आर्या कोर्टात सादर करणार ‘हा’ महत्त्वाचा पुरावा!

Good News | ‘स्लमडॉग मिलेनिअर’ फेम अभिनेत्री फ्रिडा पिंटोकडे ‘गोड बातमी’, सोशल मीडियावर बेबी बंप दाखवत शेअर केला आनंद!

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.