Kangana Ranaut: ‘घर मे घुस के मारा था ना’; ‘कॉफी विथ करण’वरून कंगनाने पुन्हा एकदा करण जोहरला डिवचलं

करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' (Koffee With Karan) या शोमध्ये कंगनाने हजेरी लावल्यापासून या वादाला खरी सुरुवात झाली. करणने कंगनाला त्याच्या 'कॉफी विथ करण'च्या पाचव्या सिझनमध्ये आमंत्रित केलं होते आणि त्याच शोमध्ये तिने करणवर बॉलिवूडमध्ये घराणेशाहीला प्रोत्साहन देण्याचा आरोप केला होता.

Kangana Ranaut: 'घर मे घुस के मारा था ना'; 'कॉफी विथ करण'वरून कंगनाने पुन्हा एकदा करण जोहरला डिवचलं
Karan Johar and Kangana RanautImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 08, 2022 | 10:25 AM

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) आणि निर्माता-दिग्दर्शक करण जोहर (Karan Johar) यांचा एकमेकांशी 36 चा आकडा आहे, हे सर्वांनाच माहित आहे. कंगना आणि करण आधी एकमेकांशी खूप चांगले वागायचे. परंतु करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ (Koffee With Karan) या शोमध्ये कंगनाने हजेरी लावल्यापासून या वादाला खरी सुरुवात झाली. करणने कंगनाला त्याच्या ‘कॉफी विथ करण’च्या पाचव्या सिझनमध्ये आमंत्रित केलं होते आणि त्याच शोमध्ये तिने करणवर बॉलिवूडमध्ये घराणेशाहीला प्रोत्साहन देण्याचा आरोप केला होता. आता करणचा कॉफी विथ करण हा शो नव्या सिझनसह ओटीटीवर येण्यास सज्ज झाला आहे. त्यानिमित्ताने कंगनाने पुन्हा एकदा सोशल मीडियाद्वारे करणवर निशाणा साधला आहे. करणच्या शोमध्ये जाण्याची आठवण सांगताना कंगनाने लिहिलं- सर्जिकल स्ट्राईक, घरात घुसून मारलं होतं ना?

कंगनाने सोशल मीडियावर करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’वर निशाणा साधत एक पोस्ट लिहिली आहे. कंगनाने लिहिलं, ‘पापा जो (करण जोहर) आज OTT वर त्याच्या सर्व प्रसिद्ध कॉफी विथ करणच्या एपिसोड्सची जाहिरात करत आहे. पापा जोला शुभेच्छा, पण या एपिसोडचं काय, अरे माफ करा! सर्जिकल स्ट्राइक, घरात घुसून मारलं होतं ना. माझा एपिसोड हा त्याचा सर्वात लोकप्रिय एपिसोड होता आणि त्यानंतर त्याच्यावर टीव्हीवर बंदी घालण्यात आली.

कंगनाची पोस्ट-

हे सुद्धा वाचा

करणवर घराणेशाहीचा आरोप

त्या शोमध्ये कंगनाने करणची खिल्ली उडवली होती आणि करण जोहरवर घराणेशाहीचा आरोप केला होता. या एपिसोडनंतर सोशल मीडियावर घराणेशाहीबद्दल बराच गदारोळ झाला आणि इंडस्ट्रीमध्ये या गोष्टींचा प्रचार करणाऱ्या बॉलिवूड स्टार्सच्या विरोधात चाहते व्यक्त होऊ लागले होते. तेव्हापासून कंगना सोशल मीडियावर सतत करण जोहरविरोधात बोलताना दिसत आहे.

चर्चेत राहण्याची एकही संधी न सोडणाऱ्या कंगनाने अलीकडेच तिच्या रिॲलिटी शोमधील दमदार परफॉर्मन्सनंतर पुन्हा एकदा करणवर निशाणा साधला होता. तिने लिहिलं, ‘लॉकअपला 200 दशलक्ष व्ह्यूज होताच संपूर्ण चंगु-मंगू गँग, निर्दयी मीडिया आणि त्यासोबत त्यांचे पापा गुपचूप रडत बसणार आहेत. माझ्याविरोधात एवढे प्रयत्न करूनसुद्धा मला 200 दशलक्ष व्ह्यूज मिळाले. अजून पुढे बघा काय होणार आहे. पापा जो तुझे रडण्याचे दिवस सुरू झाले. करण जोहरच्या विरोधात आवाज उठवत कंगनाने त्याला मूव्ही माफिया म्हटलं होतं. करण जोहरकडून पद्मश्री परत घेण्याची मागणीही तिने सरकारकडे केली होती.

“महादेव मुंडेचे खुनी 15 दिवसात जेलमध्ये...”, धस यांचा पुन्हा हल्लाबोल
“महादेव मुंडेचे खुनी 15 दिवसात जेलमध्ये...”, धस यांचा पुन्हा हल्लाबोल.
पालिका निवडणुकीच्या तोंडावर धक्का, महिला नेत्या धनुष्यबाण हाती घेणार
पालिका निवडणुकीच्या तोंडावर धक्का, महिला नेत्या धनुष्यबाण हाती घेणार.
'वाल्मिक खडा तो वो सरकार से बडा...'; आव्हाडांचा पुन्हा हल्लाबोल
'वाल्मिक खडा तो वो सरकार से बडा...'; आव्हाडांचा पुन्हा हल्लाबोल.
शिंदेंच्या बालेकिल्ल्यात निवडणूक लढवणार, उद्धव ठाकरेंची रणनिती ठरली
शिंदेंच्या बालेकिल्ल्यात निवडणूक लढवणार, उद्धव ठाकरेंची रणनिती ठरली.
कराडला ICU मध्ये ठेवणारा डॉक्टर वादाच्या भोवऱ्यात; दमानियांकडून आरोप
कराडला ICU मध्ये ठेवणारा डॉक्टर वादाच्या भोवऱ्यात; दमानियांकडून आरोप.
VIDEO : मराठी समालोचनावरुन हॉटस्टारच्या कार्यालयात धडकले मनसेचे नेते
VIDEO : मराठी समालोचनावरुन हॉटस्टारच्या कार्यालयात धडकले मनसेचे नेते.
परंड्यात एसटी बसचा अपघात, रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर बस आदळली
परंड्यात एसटी बसचा अपघात, रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर बस आदळली.
त्या 26 पोलीस अधिकाऱ्यांची बदली करा, तृप्ती देसाईंची फडणवीसांकडे मागणी
त्या 26 पोलीस अधिकाऱ्यांची बदली करा, तृप्ती देसाईंची फडणवीसांकडे मागणी.
‘छावा’ सिनेमातील ‘तो’ सीन काढला; मंत्री उदय सामंत यांची माहिती
‘छावा’ सिनेमातील ‘तो’ सीन काढला; मंत्री उदय सामंत यांची माहिती.
लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी; अपात्र तरी भरला अर्ज,पैसे घेणार रिटर्न?
लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी; अपात्र तरी भरला अर्ज,पैसे घेणार रिटर्न?.