Emergency: हुबेहूब फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉच; मिलिंद सोमणचा लूक पाहून नेटकरी थक्क!

काही दिवसांपूर्वी अभिनेता श्रेयस तळपदे आणि अभिनेत्री महिमा चौधरी यांच्या भूमिकांवरून पडदा उचलण्यात आला. आता अभिनेता मिलिंद सोमण (Milind Soman) यामध्ये फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ (Sam Manekshaw) यांच्या भूमिकेत दिसणार आहे.

Emergency: हुबेहूब फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉच; मिलिंद सोमणचा लूक पाहून नेटकरी थक्क!
Emergency: 'इमर्जन्सी'मध्ये मिलिंद सोमण साकारणार फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 26, 2022 | 1:39 PM

अभिनेत्री कंगना रनौतच्या आगामी ‘इमर्जन्सी’ (Emergency) या चित्रपटातील एकेका भूमिकेवरून पडदा उचलण्यात येत आहे. देशातील सर्वांत मोठ्या घडामोडीवर या चित्रपटाची कथा आधारित असल्याने सोशल मीडियावर तो नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेता श्रेयस तळपदे आणि अभिनेत्री महिमा चौधरी यांच्या भूमिकांवरून पडदा उचलण्यात आला. आता अभिनेता मिलिंद सोमण (Milind Soman) यामध्ये फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ (Sam Manekshaw) यांच्या भूमिकेत दिसणार आहे. मिलिंदने सोशल मीडियावर या लूकमधील फोटो पोस्ट केला असून त्यावर नेटकऱ्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

3 एप्रिल 1914 रोजी पंजाबमधील अमृतसर इथं जन्मलेले सॅम हे भारतीय लष्कराचा एक महत्त्वाचा भाग होते आणि त्यांची कीर्ती भारतासह शेजारील देश पाकिस्तानमध्येही पसरली होती. मिलिंदचा लूक हुबेहूब सॅम यांच्यासारखाच दिसत असल्याचं नेटकरी म्हणत आहेत. भारतीय लष्कराचा गणवेश, डोक्यावर टोपी आणि मोठ्या मिशा असा हा मिलिंदचा लूक आहे. सॅम माणेकशॉ यांना लष्करी कारकिर्दीत अनेक सन्मान मिळाले. वयाच्या 59 व्या वर्षी त्यांना फील्ड मार्शल ही पदवी मिळाली होती.

हे सुद्धा वाचा

‘इमर्जन्सी’ या चित्रपटात कंगना ही दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारतेय. तर अभिनेता श्रेयस तळपदे हा माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या भूमिकेत आहे. ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर हे जयप्रकाश नारायणन यांची भूमिका साकारणार आहेत. महिमा चौधरी ही पुपुल जयकार यांच्या भूमिकेत झळकणार आहे. आणीबाणीला भारतीय लोकशाहीचा काळा अध्याय मानलं जातं. हाच अध्याय कंगना तिच्या या चित्रपटातून उलगडणार आहे. कंगना रनौत ते इंदिरा गांधी असा लूकमधील ट्रान्सफॉर्मेशन ऑस्कर-विजेता डेव्हिड मालिनॉस्की यांनी केला आहे. डेव्डिड यांनी डार्केस्ट अव्हर (2017), वर्ल्ड वॉर झेड (2013) आणि द बॅटमॅन (2022) यांसारख्या चित्रपटांसाठी काम केलं आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.