Kangana Ranaut | नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी कंगना राणावत पोहचली ‘या’ खास ठिकाणी, फोटो व्हायरल
पार्टीमधील खास फोटो शेअर करत कलाकार आपल्या चाहत्यांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत.
मुंबई : बाॅलिवूडचे कलाकार नव्या वर्षाचे जंगी स्वागत करताना दिसत आहेत. कोणी अमेरिकेत तर कोणी दुबईला जात खास पध्दतीने नव्या वर्षाचे स्वागत करत आहे. मुंबईमध्ये देखील अनेक बाॅलिवूड पार्ट्या सुरू आहेत. पार्टीमधील खास फोटो शेअर करत कलाकार आपल्या चाहत्यांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत. मात्र, याला फक्त बाॅलिवूड अभिनेत्री कंगना राणावत अपवाद ठरलीये. कंगना राणावत हिने बाॅलिवूडमधील पार्ट्या सोडून मंदिरात दर्शन घेण्यासाठी गेलीये.
कंगना राणावत कायमच चर्चेत असते. विषय कोणताही असो आपले मत मांडताना कंगना कोणाचाही विचार करत नाही. कंगना सोशल मीडियावरही कायम सक्रिय असते. बाॅलिवूडमधील अनेकांसोबत कंगनाने पंगा घेतला आहे.
नव्या वर्षाच्या चाहत्यांना शुभेच्छा देत कंगना हिने सोशल मीडियावर एक खास फोटो शेअर केला आहे. विशेष म्हणजे कंगनाचा हा फोटो मंदिरामधील असून नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी कंगना ही मंदिरामध्ये गेलीये.
कंगनाने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने लाल रंगाची साडी घातलेली दिसत आहे. हातामध्ये पूजेची थाली देखील आहे. मात्र, हे नेमके कोणते मंदिर आहे हे कळू शकले नाहीये. या फोटोसोबत तिने चाहत्यांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
कंगना राणावतचा इमर्जन्सी हा चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये कंगना ही इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत असणार आहे. कंगनाचा हा चित्रपट बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित आहे.